‘बाहुबली’मधील भल्लालदेवने हे काय हाल केले? घरातील लोकांनाही ओळखणे झाले मुश्कील !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 17:22 IST2017-10-25T11:52:08+5:302017-10-25T17:22:08+5:30
या वर्षातील सुपरडुपर चित्रपट ठरलेल्या ‘बाहुबली-२’ मध्ये भल्लालदेवची भूमिका साकारणारा अभिनेता राणा दग्गुबत्ती सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. ...

‘बाहुबली’मधील भल्लालदेवने हे काय हाल केले? घरातील लोकांनाही ओळखणे झाले मुश्कील !
य वर्षातील सुपरडुपर चित्रपट ठरलेल्या ‘बाहुबली-२’ मध्ये भल्लालदेवची भूमिका साकारणारा अभिनेता राणा दग्गुबत्ती सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. भल्लादेवची भूमिका साकारून रातोरात जगभरात प्रसिद्ध झालेला राणा आता त्याच्या आगामी ‘१९४५’ मध्ये बघावयास मिळणार आहे. हॅण्डसम हंक म्हणून ओळखल्या जाणाºया राणाची फिमेल फॅनची संख्या प्रचंड आहे. या संख्येत भर पडावी म्हणून राणाने त्याचा लूक बदलला आहे. परंतु त्याचा हा नवा लूक बघून त्याचे फिमेल फॅन तर सोडाच, त्याच्या कुटुंबीयातील लोकांनाही त्याला ओळखणे अवघड झाले आहे.
नेहमीच दाढी मिशी लूकमध्ये बघावयास मिळणारा राणाने आता क्लीन शेव केली आहे. ‘१९४५’ मध्ये तो एका सोल्जरची भूमिका साकारत असल्याने, भूमिकेच्या मागणीनुसार त्याने हा नवा लूक धारण केला आहे. परंतु तो या लूकमध्ये एवढा बदललेला दिसत आहे की, त्याला ओळखणे आता अवघड झाले आहे. जेव्हा तो या लूकमध्ये घरी आला तेव्हा त्याच्या परिवारातील लोकांना त्याला ओळखणे अवघड झाले होते. त्याचे हे रूप बघून घरातील सर्वच मंडळी चकित झाली.
![]()
आपल्या या नव्या लूकविषयी सांगताना राणाने म्हटले की, ‘मी जेव्हा हा नवा लूक धारण केला तेव्हा मलादेखील स्वत:ला ओळखण्यासाठी बरेच दिवस लागले. नुकताच मी माझ्या नातेवाइकाच्या लग्नात गेलो होतो, तेव्हा त्यांनी मला ओळखलेच नाही. मला बघून प्रत्येकाच्या चेहºयावर प्रश्नचिन्ह दिसत होते. अनेकांनी तर कोण हा? असा प्रश्नही केला. त्याच्या चित्रपटांविषयी सांगताना राणाने म्हटले की, ‘१९४५ हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित आहे. चित्रपटात त्या काळातील कथा दाखविली जाईल जेव्हा साउथच्या बºयाचशा लोकांनी बर्माकडे पलायन केले होते.’