Video: विस्कटलेले केस, भिंतीवर लटकलेली दिसली ही बॉलिवूड अभिनेत्री, काय आहे ही भानगड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 19:19 IST2019-07-25T19:19:40+5:302019-07-25T19:19:53+5:30
बॉलिवूड अभिनेत्रीचा एक हॉरर व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत ती १९२०तील लूकमध्ये दिसते आहे.

Video: विस्कटलेले केस, भिंतीवर लटकलेली दिसली ही बॉलिवूड अभिनेत्री, काय आहे ही भानगड
बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा सध्या द हॉलिडे या वेबसीरिजमधून डिजिटल माध्यमात पदार्पण करते आहे. अदा शर्मा आजही तिचा हॉरर चित्रपट १९२०मुळे प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटातील अदा शर्माची भूमिका खूप भयावह होती. विचित्र गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा अदा भयानक अंदाजात पहायला मिळाली. खरेतर सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती १९२० चित्रपटातील लूकप्रमाणे दिसत आहे. हा व्हिडिओ खूप डेंजरस आहे.
अदा शर्माचा हा व्हिडिओ तिच्या फॅन क्लबने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओत अदा शर्माचा चेहरा केसांनी पूर्ण झाकलेला दिसतो आहे आणि ती भिंतीजवळ उभी आहे. तसेच या व्हिडिओत खूप विचित्र आवाज घाबरवण्यासाठी खूप आहे.
अदा शर्माने हा लूक द हॉलिडे चित्रपटातील कलाकार आशिम गुलाटी, प्रियांक शर्मा व वीरा राजवंत यांना घाबरवण्यासाठी केला होता. तिने या तिघांसोबत प्रँक करण्यासाठी असा लूक केला होता आणि त्यांना खूप घाबरवलं होतं.
तिच्या या प्रँक व्हिडिओबद्दल अदाने प्रसारमाध्यमांना सांगितलं की, द हॉलिडे या आगामी एपिसोडमध्ये प्रेक्षकांना हॉरर कॉमेडी पहायला मिळणार आहे. या सीरिजच्या शूटिंगदरम्यान एका विचित्र हॉटेलमध्ये थांबली होती. तिथली लाईटदेखील विचित्र होती. त्यावेळी मी एका टेबलावर उभी राहून चेहरा केसांनी झाकून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत होते.
अदा शर्मा सध्या या वेबसीरिजच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ही वेबसीरिज चार मित्रांच्या जीवनावर आधारीत आहे.