Hotness Reloaded : टॉपलेस झाली ईशा गुप्ता; फोटोशूटच्या टिजरने सोशल मीडियावर खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 14:18 IST2017-07-12T08:47:49+5:302017-07-12T14:18:34+5:30

​हॉलिवूड अभिनेत्री अ‍ॅँजेलिना जोलीशी तुलना केली जात असलेली बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या भलतीच चर्चेत आहे.

Hotness Reloaded: The topless goes by Isha Gupta; Photoshoot tizarre sensation on social media! | Hotness Reloaded : टॉपलेस झाली ईशा गुप्ता; फोटोशूटच्या टिजरने सोशल मीडियावर खळबळ!

Hotness Reloaded : टॉपलेस झाली ईशा गुप्ता; फोटोशूटच्या टिजरने सोशल मीडियावर खळबळ!

लिवूड अभिनेत्री अ‍ॅँजेलिना जोलीशी तुलना केली जात असलेली बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या भलतीच चर्चेत आहे. ईशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लागोपाठ दोन हॉट व्हिडीओ शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. दुसºया व्हिडीओमध्ये ईशा टॉपलेस असून, तिचा हा अवतार खूपच सेक्सी दिसत आहे. वास्तविक ईशाचे हे व्हिडीओ तिच्या एका फोटोशूटचे असून, त्याच्या टिजरने सोशल मीडियावर धूम उडवून दिली आहे. 

ALSO READ : Watch Video : ईशा गुप्ताच्या हॉट व्हिडीओने लावली आग!

ईशाचे हे दोन्ही व्हिडीओ सध्या व्हायरल केले जात असल्याने ती चांगलीच चर्चेत आली आहे. दरम्यान हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर अर्जुन मार्क यांनी केले आहे. हे व्हिडीओ शेअर करताना अर्जुनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ही त्या फोटोशूटची झलक आहे, जे कित्येक सीमा पार करणार आहे.’ ईशाने कालच एक व्हिडीओ शेअर करून खळबळ उडवून दिली होती. ईशाचे हे दोन्ही व्हिडीओ तुफान पसंत केले जात असून, काही क्षणातच त्याला हजारोंच्या संख्येने कमेण्ट मिळत आहेत. आता सगळ्यांना तिच्या या फोटोंची प्रतीक्षा आहे.
 

इन्स्टाग्रामवर ईशाचे दीड मिलियन फॉलोअर्स असून, ती नेहमीच फॉलोअर्सच्या संपर्कात असते. सध्या तिने हे व्हिडीओ शेअर केल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दरम्यान, सध्या ईशा तिच्या आगामी ‘बादशाहो’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, त्यामध्ये तिचा अंदाज बघण्यासारखा आहे. चित्रपटात ईशासह अजय देवगण, इमरान हाशमी, सलियाना डिक्रूज आणि विद्युत जामवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा आहे. 
 

वास्तविक ईशा तिच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर शेअर करीत असलेल्या हॉट फोटोंमुळे अधिक चर्चेत असते. सध्या ईशा पोल डान्स शिकत असून, त्याचे काही फोटोज् आणि व्हिडीओ तिने शेअर केले होते. यामध्येही तिचा सेक्सी अंदाज बघावयास मिळाला होता. सध्या ईशा तिच्या आगामी ‘बादशाहो’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याबाबतचेही फोटोज ती शेअर करीत आहे. 

Web Title: Hotness Reloaded: The topless goes by Isha Gupta; Photoshoot tizarre sensation on social media!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.