Hotness Alert! उर्वशी रौतेलाने शेअर केला ब्लॅक मोनोकनीमधील बोल्ड फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 19:33 IST2020-04-10T19:32:31+5:302020-04-10T19:33:15+5:30

उर्वशी रौतेला हिने इंस्टाग्रामवर बोल्ड फोटो शेअर केला आहे.  

Hotness Alert! Urvashi Routella shared a bold photo in black monokini TJL | Hotness Alert! उर्वशी रौतेलाने शेअर केला ब्लॅक मोनोकनीमधील बोल्ड फोटो

Hotness Alert! उर्वशी रौतेलाने शेअर केला ब्लॅक मोनोकनीमधील बोल्ड फोटो


गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करते आहे. फोटोंसोबतच ती बोल्ड व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे सातत्याने चर्चेत येत असते.


उर्वशी रौतेला हिने इंस्टाग्राम अकाउंटवरून बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोत उर्वशीनं ब्लॅक मोनोकनी घातली आहे. बॅकलेस डिप नेक असेलल्या या मोनोकनीत उर्वशी खूप बोल्ड दिसते आहे. तिच्या या फोटोवर खूप लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.


उर्वशीने  फोटो शेअर करून   म्हटले की,'प्रेम विष असलं तरीही आम्ही ते पिऊ.'

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वी ती एक डायमंड दा हार लेदे यार या म्युझिक व्हिडीओत दिसली होती. असंही बोललं जात आहे की, ती कार्तिक आर्यनच्या भूलभूलैया या सिनमात दिसणार आहे.

सनी देओलसोबत उर्वशीनं आपला बॉलिवूड डेब्यू केला होता. सिंह साहब दी ग्रेट असं तिच्या पहिल्या सिनेमाचं नाव होतं. याशिवाय तिनं अनेक म्युझिक व्हिडीओत काम केलं आहे. रॅपर हनी सिंगच्या लव डोस गाण्यातही ती दिसली आहे.

भाग जानी, सनम रे अशा अनेक सिनेमात तिनं काम केलं आहे. 22 नोव्हेंबर 2019 रोजी रिलीज झालेल्या पागलपंती मल्टीस्टारर सिनेमातही तिनं काम केलं आहे.

Web Title: Hotness Alert! Urvashi Routella shared a bold photo in black monokini TJL