HOT NEWS : ​जस्टीन बीबरसोबत सनी लिओनी सुद्धा थिरकणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 13:32 IST2017-03-02T08:02:54+5:302017-03-02T13:32:54+5:30

सिंगीग सेन्सेशन जस्टीन बीबर याच्या मुंबईतील लाईव्ह शोची तुम्हाला प्रतीक्षा असणार. पण मे महिन्याला अद्याप बराच अवकाश आहे. तोपर्यंत ...

HOT NEWS: Sunny Leone with Justin Bieber also slipped! | HOT NEWS : ​जस्टीन बीबरसोबत सनी लिओनी सुद्धा थिरकणार!

HOT NEWS : ​जस्टीन बीबरसोबत सनी लिओनी सुद्धा थिरकणार!

ंगीग सेन्सेशन जस्टीन बीबर याच्या मुंबईतील लाईव्ह शोची तुम्हाला प्रतीक्षा असणार. पण मे महिन्याला अद्याप बराच अवकाश आहे. तोपर्यंत जस्टीनला लाईव्ह ऐकण्यासाठी आतूर असलेल्यांसाठी आमच्याकडे एक बातमी आहे. होय, जस्टीन बीबरसोबत दीपिका पादुकोण,वरूण धवन, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा असे सगळे परफॉर्म करणार, ही बातमी आम्ही तुम्हाला दिलीच होती. आता जस्टीनसोबत परफॉर्म करणाºया बॉलिवूड सेलिब्रिटींच्या यादीत आणखी एक नवे नाव जुळले आहे. हे नाव आहे, बॉलिवूडची हॉट डॉल सनी लिओनी हिचे. सनी जस्टीनसोबत परफॉर्म करणार, हे जवळपास फायनल झाले आहे. सनीचे नाव या यादीत येणे, खरे तर यात काहीही आश्चर्यकारक नाही. कारण सनी भारत व विदेशातील एक परिचित नाव आहे.



‘Purpose World Tour’च्या निमित्ताने जस्टीन बीबर भारतात येणार आहे. १९९५ साली ‘किंग आॅफ पॉप’ मायकल जॅक्सनचा भव्यदिव्य शो आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून मुंबईचे नाव आंतरराष्ट्रीय पटलावर मोठ्या अक्षरांत उमटले गेले. जस्टीन बीबरचे भारतात असंख्य चाहते आहेत. खासकरून तरुण मुल-मुलींमध्ये त्याची खूप क्रेझ आहे. त्यामुळे त्याला लाईव्ह पाहण्यासाठी लोकांची गर्दी उफाळून येईल असे म्हटले तर वावगे ठरू नये.
 नुकतेच बीबरने ‘अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्स’मध्ये सर्वाधिक पुरस्कारांवर आपले नाव कोरले. यामध्ये ‘व्हिडिओ आॅफ द इयर’ (सॉरी), ‘फेव्हरेट मेल आर्टिस्ट पॉप/रॉक’ आणि ‘फेव्हरेट अल्बम पॉप/रॉक’ या कॅटेगरीज्मध्ये त्याने बाजी मारली. ‘बेबी’ गाण्यामुळे प्रकाश झोतात आलेल्या जस्टीनने वयाच्या केवळ २२ व्या वर्षी ड्रेक, द विकेंड, एडेल यासारख्या दिग्गज कलावंतांना मागे टाकले.

जस्टीन त्याच्या खासगी जीवनातील अफेयर्समुळेदेखील नेहमीच चर्चेत असतो. तसेच तो विलासी व सुखवस्तू जीवनशैलीसाठी तो ओळखला जातो. गेल्या वर्षी त्याने दिलखुलास पार्टी करण्यासाठी लंडनमध्ये एक आलिशान घर किरायाने घेतले आहे. लंडन स्थित २४ हजार चौ. फुट क्षेत्रफळावर पसरलेल्या या घराचा किराया दरमाह १.०८ लाख पाऊंड (८८.६१ लाख रुपये) एवढा आहे.

Web Title: HOT NEWS: Sunny Leone with Justin Bieber also slipped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.