HOT NEWS: ‘या’ चित्रपटात प्रियांका चोप्रा साकारणार वेश्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 12:27 IST2017-02-03T06:57:44+5:302017-02-03T12:27:44+5:30

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा मागच्या काही वर्षांपासून हिंदी सिनेमातून गायब आहे. हॉलीवूडमध्ये यशस्वी करिअर उभे केल्यानंतर प्रियांका आता पुन्हा ...

HOT NEWS: Priyanka Chopra will be a prostitute in this film. | HOT NEWS: ‘या’ चित्रपटात प्रियांका चोप्रा साकारणार वेश्या!

HOT NEWS: ‘या’ चित्रपटात प्रियांका चोप्रा साकारणार वेश्या!

ेसी गर्ल’ प्रियांका चोप्रा मागच्या काही वर्षांपासून हिंदी सिनेमातून गायब आहे. हॉलीवूडमध्ये यशस्वी करिअर उभे केल्यानंतर प्रियांका आता पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये काम करण्यास उत्सुक आहे. नवीन वर्षानिमित्त भारतात आल्यावर तिने काही प्रोजेक्ट निश्चित केले असून त्यामध्ये संजय लीला भंसाळीच्या चित्रपटाला तिने सहमती दर्शविली असल्याचे कळतेय.

प्रियांका चोप्रा भंसाळींच्या दिग्दर्शनात परत एकदा बॉलीवूडमध्ये येणार आहे. एका पुस्तकावर आधारित या सिनेमात ती वेश्येच्या भूमिकेत असून वेश्यालयातील खडतर जीवनाच्या पार्श्वभूमीवर पटकथा आधारित असल्याची माहिती आहे. अद्याप प्रियांका किंवा भंसाळीच्या चमूतून या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

 ALSO READ: ‘बेवॉच’​ समर पोस्टर्समध्येही प्रियांका चोपडाच्या को-स्टार्सनीच लावला बोल्डनेस तडका

विशेष म्हणजे राणी मुखर्जीला या रोलसाठी विचारणा करण्यात आली होती. तिला पटकथाासुद्धा आवडली होती आणि ती चित्रपट स्वीकारण्याबाबत सकारात्मक होती. परंतु ‘वेश्ये’ची भूमिका तिने यापूर्वी केलेली असल्यामुळे तिच्या सल्लागारांनी तिला हा चित्रपट न करण्याची सूचना केली आणि राणीने प्रोजेक्टमधून माघार घेतली.

                                       Priyanka GQ

तसेच प्रियांका शाहरुख खानसोबतही दिसण्याची शक्यता आहे. गीतकार साहिर लुधयानवी यांच्या जीवनावर आधारित ‘गुस्ताखी’ या चित्रपटात हे दोघे असू शकतात. अनेक महिन्यांपासून याविषयी चर्चा सुरू असून आगामी काही आठवड्यांमध्ये प्रियांकाकडून याबाबत घोषणा केली जाणार आहे.

ALSO READ: शाहरुख खानला स्क्रीप्ट आवडूनही ‘यामुळे’ रखडतोय साहिर लुधियानवी बायोपिक

प्रियांका सध्या ‘क्वांटिको’च्या दुसऱ्या पर्वाची शूटींग करीत असून त्यानंतर ती मे महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या तिची हॉलीवूड डेब्यू फिल्म ‘बेवॉच’च्या प्रोमोशनमध्ये व्यस्त होणार आहे. ‘बेवॉच’मध्ये तिच्यासोबत ड्वेन जॉन्सन (द रॉक) आणि झॅक अफ्रॉन हे कलाकार असून ती नकारात्मक भूमिकेत आहे.

तसेच प्रियांका निर्मितीच्या क्षेत्रातही सक्रीय असून प्रादेशिक भाषेतील चित्रपट निर्माण करण्यावर ती लक्ष देत आहे. नुकतेच तिच्या बॅनर अंतर्गत दुसऱ्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्या आली. गेल्या वर्षी तिने ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली.

Web Title: HOT NEWS: Priyanka Chopra will be a prostitute in this film.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.