हॉट अवतारात पुन्हा परतली नव्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2016 07:29 PM2016-11-03T19:29:58+5:302016-11-03T19:56:42+5:30

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा आपल्या बिनधास्तपणासाठी बॉलिवूडमध्ये ख्यात आहेच. आता ती पुन्हा एकदा हॉट अवतारात ...

Hot new avatars back to the new | हॉट अवतारात पुन्हा परतली नव्या

हॉट अवतारात पुन्हा परतली नव्या

googlenewsNext
ong>बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा आपल्या बिनधास्तपणासाठी बॉलिवूडमध्ये ख्यात आहेच. आता ती पुन्हा एकदा हॉट अवतारात परतली आहे. मागील काही दिवसांपासून नव्या ही लाईमलाईटपासून दूर होती. यामुळे तिची काही खबरबात नव्हती. याच दरम्यान नव्याने एका पार्टीमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. काही वेळातच हे फोटो व्हायरल झाले असून, यात ती हॉट व बोल्ड दिसत आहे.

सर्वाधिक  स्टायलिश स्टार किड्स म्हणून नव्याने मागील काही वर्षांत ख्याती मिळविली आहे. नव्या आपले फोटो सोशल नेटवर्किंग साईट्सवर अपलोड करणे व पार्ट्यांमध्ये हजेरी लावणे हे नव्याला रुचते. यामुळेच ती आपल्या अ‍ॅक्टिव्हिटी व पाटीर्चे फोटो नेहमीच शेअर करीत असते. ती सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असल्याने नेहमीच बॉलिवूडच्या चर्चेत स्थान मिळविते. काही दिवसांपूर्वी नव्या करण जोहरचा आगामी ह्यस्टुडंटस आॅफ द इअर २ह्ण मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशा बातम्यांना ऊत आला होता, मात्र नव्याने आपले शिक्षण पूर्ण करण्यास प्राधान्य दिले असल्याचे सांगण्यात आले.

 

नव्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आपल्या नेहमीप्रमाणे बोल्ड अंदाजात दिसते आहे. ती एका पबमध्ये पार्टी करीत असल्याचे हे फोटो आहेत. नव्यासोबत तिचे मित्रही पार्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. 

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी आपल्या नात नव्या आणि आराध्याला खुले पत्र लिहिले होते. यात त्यांनी मुलींनी बंधनातून मुक्त होत जीवन जगण्याचा सल्ला दिला होता. मात्र हे पत्र अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या पिंक चित्रपटाच्या प्रमोशन शेड्यूलमुळे लिहिले होते असे सांगण्यात येते. 

Web Title: Hot new avatars back to the new

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.