'हॉस्पिटलचे प्रोटोकॉल खूपच कठीण...', अभिषेक बच्चनचा फोटो शेअर करत भावूक झाले बिग बी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 12:53 IST2020-07-18T12:52:51+5:302020-07-18T12:53:31+5:30

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना सोडून बच्चन कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून नानावटी रुग्णालयात दाखल आहेत.

'Hospital protocol is very difficult ...', Big B gets emotional by sharing Abhishek Bachchan's photo | 'हॉस्पिटलचे प्रोटोकॉल खूपच कठीण...', अभिषेक बच्चनचा फोटो शेअर करत भावूक झाले बिग बी

'हॉस्पिटलचे प्रोटोकॉल खूपच कठीण...', अभिषेक बच्चनचा फोटो शेअर करत भावूक झाले बिग बी

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना सोडून बच्चन कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चनअभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून नानावटी रुग्णालयात दाखल आहेत. शुक्रवारी रात्री ऐश्वर्या राय बच्चन व आराध्य बच्चनदेखील रुग्णालयात दाखल झाले आहेत. सध्याच्या घडीला त्यांचे चाहते बच्चन कुटुंब लवकर कोरोनामुक्त होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. हॉस्पिटलमध्ये असूनही अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानत आहेत. नुकतेच अमिताभ बच्चन यांनी भावुक पोस्ट शेअर केली आहे.


अमिताभ बच्चन यांनी हॉस्पिटलमधून एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यासोबत त्यांनी स्वतःचा आणि अभिषेकचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी ट्विट करत सगळ्यांचे आभार मानत म्हटले की, चाहते नेहमी त्यांच्या सुख दुःखात सोबत उभे राहतात. मग आनंद असो किंवा आजारी. तुम्ही जवळचे आणि प्रिय, शुभेच्छुक, चाहते, तुम्ही सगळ्यांनी नेहमी आम्हाला प्रेम दिले. आमच्यासाठी प्रार्थना केली. तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी कृतज्ञता व्यक्त करतो. या परिस्थितीत हॉस्पिटलचे प्रोटोकॉल खूप कठोर आहेत.


यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांचे आभार मानत ट्विट केले होते की, मला एसएमएस, व्हॉट्सएप, इंस्टा, ब्लॉग आणि सर्व सोशल मीडिया माध्यमातून आमच्या भल्यासाठी आशीर्वाद, प्रेम व प्रार्थना मिळत असते. माझ्या कृतज्ञतेला कोणतीच सीमा नाही. हॉस्पिटलचा प्रोटोकॉल प्रतिबंधात्मक आहे. मी आणि आणखीन नाही बोलू शकत.. प्रेम.

11 जुलै रोजी अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह आले होते. ही माहिती खुद्द त्यांनीच सोशल मीडियावर दिली होती. अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची टेस्ट करण्यात आली होती. त्यात जया बच्चन सोडून इतर सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

Web Title: 'Hospital protocol is very difficult ...', Big B gets emotional by sharing Abhishek Bachchan's photo