हुडा म्हणतो,‘स्वत:ची घरे जाळू नका’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 22:53 IST2016-02-21T05:51:19+5:302016-02-20T22:53:42+5:30

हरयाणातील जाट सध्या ओबीसी वर्गातील राखीव जागांसाठी पेटून उठले आहेत. नोकरी आणि शैक्षणिक संस्थांतील ओबीसी आरक्षण मिळावे म्हणून गेल्या ...

Hooda says, 'Do not burn your own houses' | हुडा म्हणतो,‘स्वत:ची घरे जाळू नका’

हुडा म्हणतो,‘स्वत:ची घरे जाळू नका’

याणातील जाट सध्या ओबीसी वर्गातील राखीव जागांसाठी पेटून उठले आहेत. नोकरी आणि शैक्षणिक संस्थांतील ओबीसी आरक्षण मिळावे म्हणून गेल्या तीन दिवसांपासून हरयाणातील जाट हिंसक झाले आहेत. सार्वजनिक जागेवर वाहने जाळत असून लोकांनाही त्रास देत आहेत. दुकाने आणि मॉल्स जाळत आहेत. एवढेच नव्हे तर स्वत:ची घरे देखील जाळून खाक करत आहेत, त्यांना अभिनेता रणदीप हुडा याने आवाहन केले आहे की, स्वत:चीच घरे जाळू नका.’ 

राज्यातील रोहतक या शहरात जास्त विध्वंसक कृत्य सुरू आहे. त्यावर रणदीप हुडाने शेवटी टिष्ट्वटरवर पोस्ट केले. रणदीप स्वत: जाट आहे. त्याने त्याच्या समाजातील लोकांना शांती ठेवण्याचे आवाहन केले आहे. टिष्ट्वटमध्ये त्याने म्हटले आहे की,‘ तुमच्या मागण्या शांततेच्या पद्धतीने समोर ठेवा, असा विध्वंस करू नक ा  ’रणदीप हुडा सध्या ‘सरबजीत’ या त्याच्या आगामी बायोपिकवर काम करत आहे.  

Web Title: Hooda says, 'Do not burn your own houses'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.