म्युझिक व्हिडिओ, चित्रपटा रॅपर केल्यानंतर हे काम करणार हनी सिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 16:08 IST2018-01-12T10:38:36+5:302018-01-12T16:08:36+5:30
म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटात आपला जलवा दाखवल्यानंतर हनी सिंग लवकरच विक्रम भट्ट यांच्या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार ...

म्युझिक व्हिडिओ, चित्रपटा रॅपर केल्यानंतर हे काम करणार हनी सिंग
म युझिक व्हिडिओ आणि चित्रपटात आपला जलवा दाखवल्यानंतर हनी सिंग लवकरच विक्रम भट्ट यांच्या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार ही वेब सीरिज हनी सिंग यांच्या आयुष्यावर आधारित आहे. हद, तंत्र आणि माया सारख्या पॉप्युलर वेब सिरिज बनवल्यानंतर दिग्दर्शक विक्रम भट्ट पुन्हा एकदा वेब सिरीजकडे वळले आहेत. ‘
रिपोर्टनुसार वेब सिरिजमध्ये हनी सिंगचा सेलिब्रेटी होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रमने काही लोकांना या सिरिजे भाग दाखवले आहेत आणि ही वेबसिरिज हनी सिंगच्या आयुष्यावर आधारित आहे. मात्र ही गोष्ट अजून अधिकृतरित्या सांगण्यात आलेली नाही.
हाय हिल्स’, ‘लुंगी डान्स’,‘देसी कलाकार’,‘अंग्रेजी बीट’ असे पार्टी साँग गाऊन चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला रॅपर हनी सिंह गेल्या 18 महिन्यांपासून या झगमगत्या दुनियेपासून दूर होता. नुकतेट त्याचे ‘चोरी साडा’ हे गाणे रिलीज झाले. मध्यंतरी ज्यावेळी हनी सिंग गायब होता त्यावेळी तो रिहॅब सेंटरमध्ये असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण मी नोएडातील माझ्या घरी होतो, असे हनीने सांगितले होते. तसेच तो म्हणाला होता की, मी बायपोलर डिसआॅर्डरशी माझी झुंज सुरु होती. यादरम्यान मी चार डॉक्टर बदलले. औषधांचा माझ्यावर कुठलाही परिणाम होत नव्हता. मी अक्षरश: वेडा झालो होतो. ते १८ महिने माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण दिवस होते. काही दिवसांपूर्वी हनी सिंगच्या आयुष्यावर बायोपिक तयार करण्यात येणार असल्याची चर्चा होती. या बायोपिकसाठी मेकर्सने हनीला २५ कोटी रूपयांची रक्कम आॅफर केल्याचे कळतेय.
गत वर्षी 31 डिसेंबरला हनी दिल्लीच्या रस्त्यावर एका स्ट्रिट सिंगरला चीअर करताना दिसला होता. दिल्लीच्या खान मार्केटमध्ये एका स्ट्रिट सिंगरला चीअर करतानाचा हनीचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होतो आहे. हनीने त्याच्या फेसबुक व इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला होता.