यो यो हनी सिंह..., रॅपर पुन्हा प्रेमात, गर्लफ्रेन्डचा हात हातात घेऊन पोहोचला कार्यक्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 13:10 IST2022-12-07T13:09:57+5:302022-12-07T13:10:37+5:30

Yo Yo Honey Singh : होय, पत्नी शालिनी तलवारला घटस्फोट दिल्यानंतर हनी सिंह एका मॉडेल व अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे. कोण आहे ती?

honey singh finds love again spotted with new girlfriend tina thadani | यो यो हनी सिंह..., रॅपर पुन्हा प्रेमात, गर्लफ्रेन्डचा हात हातात घेऊन पोहोचला कार्यक्रमात

यो यो हनी सिंह..., रॅपर पुन्हा प्रेमात, गर्लफ्रेन्डचा हात हातात घेऊन पोहोचला कार्यक्रमात

प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंह ( Yo Yo Honey Singh)  पुन्हा प्रेमात पडला आहे. होय, पत्नी शालिनी तलवारला घटस्फोट दिल्यानंतर हनी सिंह एका मॉडेल व अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे. हनीच्या ‘लेडीलव्ह’चं नाव आहे, टीना थडानी (Tina Thadani).

गेल्या अनेक दिवसांपासून हनी व टीनाच्या लव्ह अफेअरच्या चर्चा होत्या. पण हनीने त्यावर मौन बाळगलं होतं. पण नुकताच  हनी सिंह दिल्लीत एका इव्हेंटमध्ये दिसला, ते सुद्धा गर्लफ्रेन्डच्या हातात हात घालून. हनी व टीना पब्लिकली पहिल्यांदाच एकत्र दिसल्याने दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालंय.

 हनी सिंहची नवी गर्लफ्रेन्ड टीना थडानी ही मॉडेल व अभिनेत्री आहे. दोघंही ‘पॅरीस का ट्रिप’ या गाण्यात एकत्र दिसले होते. टीना ही एक दिग्दर्शिकाही आहे. ... हा सिनेमा तिने दिग्दर्शित केला होता. रिअल लाईफमध्ये टीना प्रचंड ग्लॅमरस व स्टायलिश आहे. सोशल मीडियावर सुपर अ‍ॅक्टिव्ह असलेल्या टीनाच्या इन्स्टाग्रामवर तिचे एकापेक्षा एक हॉट फोटो बघायला मिळतील.

सप्टेंबर 2022 मध्ये हनीने पत्नी शालिनी तलवारला घटस्फोट दिला. दोघांचा 20 वर्षांचा संसार यामुळे संपुष्टात आला.  शालिनीने 20 कोटींची पोटगी मागितली होती. पण घटस्फोटावेळी हनीने तिला फक्त 1 कोटी दिले. घटस्फोटानंतर शालिनीने हनीवर गंभीर आरोप केले होते. हनीने आपल्याला मारहाण केली. शारिरीक व मानसिक छळ केला. त्याने माझा विश्वासघात केला. शिवाय आर्थिक फसवणूकही केली, असं तिने म्हटलं होतं. हनीने अर्थातच हे सर्व आरोप धुडकावून लावले होते.

Web Title: honey singh finds love again spotted with new girlfriend tina thadani