OMG! प्रियंका चोप्राच्या प्रेमात ठार वेडा झाला होता ‘हा’ हॉलिवूडचा हार्टथ्रोब, घातली होती लग्नाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 08:00 IST2022-05-04T08:00:00+5:302022-05-04T08:00:06+5:30

Priyanka Chopra : देसी गर्ल प्रियंका चोप्राची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. आज ती ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. जगभर तिचे चाहते आहेत. पण एक चाहता सगळ्यांत न्यारा आहे.

Hollywood star Gerard Butler had once proposed to Priyanka Chopra | OMG! प्रियंका चोप्राच्या प्रेमात ठार वेडा झाला होता ‘हा’ हॉलिवूडचा हार्टथ्रोब, घातली होती लग्नाची मागणी

OMG! प्रियंका चोप्राच्या प्रेमात ठार वेडा झाला होता ‘हा’ हॉलिवूडचा हार्टथ्रोब, घातली होती लग्नाची मागणी

Priyanka Chopra Gerard Butler Story: देसी गर्ल प्रियंका चोप्राची (Priyanka Chopra) नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. आज ती ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. जगभर तिचे चाहते आहेत. पण एक चाहता सगळ्यांत न्यारा आहे. होय, म्हणायला त्याच्यावर जगभरातील मुली फिदा आहेत. परंतु  तो मात्र प्रियंकाच्या प्रेमात वेडा आहे. इतका की, एकेकाळी तो तिच्यासाठी काहीही करायला तयार होता. तिला मिळवण्यासाठी, तिच्या हृदयात जागा मिळवण्यासाठी त्याने काय काय केलं नाही? आता त्याचं नाव काय तर जेरार्ड बटलर (Gerard Butler).

होय, हॉलिवूडचा सुपरस्टार जेरार्ड बटलर पहिल्याच नजरेत प्रियंकाच्या प्रेमात पडला होता. 2009 चा किस्सा. जेरार्ड भारतात आला तेव्हा प्रियंकाने त्याच्यासाठी वर्सोवा येथील आपल्या घरी एक पार्टी ठेवली होती. त्या पार्टीत जेरार्डनं प्रियंकाचं मन जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. इतकंच नाही तर तिला लग्नासाठी प्रपोजही केलं होतं. काही रिपोर्टनुसार, जेरार्ड वारंवार गुडघ्यावर बसून प्रियंकाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत तिला प्रपोज करत होता. दर अर्ध्या तासानं तो यायचा आणि प्रियंकाला प्रपोज करायचा. प्रियंका ते पाहून खळखळून हसायची. अनेकांनी हा जोक म्हणून घेतला. पण जेरार्ड खरोखर प्रियंकावर भाळला होता.

2012 मध्ये त्याने प्रियंकावरच्या प्रेमाची जाहिर कबुली दिली होती. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत तो यावर बोलला होता. ‘गेल्यावर्षी प्रियंका इथे आली होती आणि नेमक्या त्यावेळी मी शहराबाहेर होतो. मी तिला भेटू शकलो नव्हतो. तिला भेटण्यासाठी मी फ्लाईट मिस करायचा विचारही केला होता. कारण मला तिला भेटायचं होतं. अद्यापही मी सिंगल आहे. कारण मी प्रियंकाची वाट पाहतोय,’असं तो म्हणाला होता.

अर्थात जेरार्डनं इतकं करूनही प्रियंका व त्याच्यात काहीही होऊ शकलं नाही. आताश: दोघंही आपआपल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. जेरार्ड मॉर्गन ब्राऊनला दीर्घकाळापासून डेट करतोय आणि प्रियंका निक जोनाससोबत सुखात नांदतेय. प्रियंकाने 2018 साली निकसोबत लग्नगाठ बांधली. यावर्षी प्रियंका सरोगसीद्वारे एका मुलीची आई सुद्धा झाली. 

Web Title: Hollywood star Gerard Butler had once proposed to Priyanka Chopra