धनुष झळकणार हॉलिवूड चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2017 10:44 IST2017-05-18T05:14:09+5:302017-05-18T10:44:09+5:30
रजनीकांतचा जावई आणि साऊथचा स्टार धनुष आता हॉलिवू़डच्या चित्रपटात झळकणार आहे. धनुषने साऊथ चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्ये आपले वेगळ स्थान निर्माण ...

धनुष झळकणार हॉलिवूड चित्रपटात
र नीकांतचा जावई आणि साऊथचा स्टार धनुष आता हॉलिवू़डच्या चित्रपटात झळकणार आहे. धनुषने साऊथ चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्ये आपले वेगळ स्थान निर्माण केले आहे. आता धनुष हॉलिवूडमध्ये एंट्री घेतो आहे. त्याच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे नाव आहे 'दि एक्स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ दि फकीर'. याचित्रपटाची शूटिंग करताना धनुष मुंबईतल्या रस्त्यांवर दिसला आहे.
![]()
या चित्रपटाचे दिग्दर्शन केन स्कॉट करतो आहे. तर हा चित्रपट लेखक रोमान पोर्टुलास यांच्या कांदबरीवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे शूटिंग मुंबई, पॅरिस, ब्रुसेल्स आणि रोममध्ये होणार आहे. मुंबईत झालेल्या शूटिंग दरम्यानचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक केन स्कॉटने एका इंटरव्ह्यू दरम्यान धनुषच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. स्कॉट म्हणतो, ''धनुषच्या नाचण्याची आणि गाण्याची स्टाइल वेगळी आहे. तिच त्याला इतरांपेक्षा वेगळी ठरवते.'' अजून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली नाही आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत एरिन मोरिआर्टी, सीमा बिस्वास आणि लॉरेन लफिट यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. मध्यंतरी एका वृद्ध दांम्पत्याने धनुष आपला मुलगा असल्याचा दावा केला होता. मद्रास हाय कोर्टाने यासंदर्भातील संबंधीत दांम्पत्याची याचिका फेटाळली होती आणि धनुष हा खटला जिंकला होता. धनुषाच्या व्हाय धिस कोलावरी डी या गाण्यांने प्रेक्षकांना वेड लावले होते. या गाण्यामुळे धनुषला घरोघरी ओळखले जाऊ लागले. यू ट्यूबवर हे गाणे १00 कोटी लोकांनी पाहिले आहे. बॉलिवूडमध्ये रांझणा चित्रपटानंतर धनुष प्रकाशझोतात आला. आता तर थेट धनुष हॉलिवूडची वारी करणार आहे. त्यामुळे धनुषचे फॅन्स नक्कीच आनंदात असतील.