हॉलिवूडपटांचा बॉलिवूडला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 13:57 IST2016-06-12T08:27:45+5:302016-06-12T13:57:45+5:30

महानायक अमिताभ बच्चन यांनी १९९५ मध्ये त्यांच्याशी घडलेला हॉलीवुडशी संबंधित एक कटू प्रसंग नुकताच कथन करीत हॉलीवुड हे बॉलीवुडला ...

Hollywood footsteps hit Hollywood | हॉलिवूडपटांचा बॉलिवूडला फटका

हॉलिवूडपटांचा बॉलिवूडला फटका

ानायक अमिताभ बच्चन यांनी १९९५ मध्ये त्यांच्याशी घडलेला हॉलीवुडशी संबंधित एक कटू प्रसंग नुकताच कथन करीत हॉलीवुड हे बॉलीवुडला घातक असल्याचे म्हटले होते. अमिताभच नव्हे तर किंग खान आणि इरफान खान यांनी देखील हॉलीवुडमुळे बॉलीवुडला फटका बसत असल्याचे वक्तव्य केले होते. या दिग्गज कलाकारांच्या वक्तव्यांमध्ये कितपत सत्यता आहे हे गेल्या सहा महिन्यात बॉक्स आॅफीसवर हॉलीवुड, बॉलीवुड चित्रपटांनी केलेल्या कलेक्शनवरून स्पष्ट होते. या कमाईच्या लढाईत हॉलीवुडने बॉलीवुडमधील बड्या बॅनरच्या चित्रपटांना धोबीपछाड दिल्याने, हॉलीवुड बॉलीवुडवर सरस ठरत असल्याची चर्चा आता रगु लागली आहे. नुकताच रिलीज झालेला ‘हाउसफुल-३’ बॉक्स आॅफिसवर चांगली ओपनिंग करण्यात जरी यशस्वी ठरला असला तरी, येत्या काळात रिलीज होणाºया हॉलीवुडपटाशी या चित्रपटाला जबरदस्त फाईट द्यावी लागेल, हे निश्चित...

Housefoof v/s ninja turtles
हाऊसफुल v/s निंजा टर्टल 
साजिद नाडियाडवाला यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हाऊसफुल-3’ या कॉमेडी चित्रपटाने बॉक्स आफिसवर चांगली ओपनिंग करताना पहिल्याच आठवड्यात वर्ल्डवाईड शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमविला. २०१६ मध्ये अशी जबरदस्त ओपनिंग करणारा हा पहिलाच चित्रपट ठरल्याने येत्या काळात हा चित्रपट कमाईचे आणखी रेकॉर्ड करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.  मात्र त्याचबरोबर या आठवड्यात रिलीज होणाºया ‘निंजा टर्टल’, ‘कैजरिंग 2 : द एनफील्ड पोल्टरगीस्ट’, ‘सुसाईड स्क्वैड’, ‘फनटास्टिक बीस्ट्स अ‍ॅण्ड व्हेयर टू फार्इंड देम’ हे हॉलिवूडपट रिलीज होणार असल्याने हाउसफुल-3 ला जबरदस्त फाईट द्यावी लागणार आहे. यामध्ये निंजा टर्टल हा बिग बजेट चित्रपट असून, हाऊसफुल-3ला कडवी टक्कर देवू शकतो. 

Fan v/s the jungle book
फॅन v/s  द जंगल बुक
८ एप्रिल रोजी भारतात रिलीज झालेल्या ‘द जंगल बुक’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करीत पुढील तीन ते चार आठवडे दबदबा कायम ठेवला. यामुळे द जंगल बुकच्या आठवडभरानंतर रिलीज झालेल्या सुपरस्टार शाहरुख खानच्या ‘फॅन’ या चित्रपटाला फारसा करिष्मा करता आला नाही. अन्यथा शाहरुखचा चित्रपट म्हटले की, काही दिवसांमध्ये शंभर कोटींचा क्लब निश्चित समजला जातो. मात्र द जंगल बुकने या चित्रपटाला अक्षरश: ब्रेक लावला. खरं तर फॅनने द जंगल बुकच्या (१० कोटी) तुलनेत पहिल्याच दिवशी १९ कोटी रुपयांचा आकडा पार केला होता. मात्र त्यानंतर ९० कोटी रुपयांचा गल्ला जमविण्यासाठी फॅनला चांगलीच धडपड करावी लागली. तर द जंगल बुकने तब्बल १८३ कोटी रुपयांची कमाई  करून आतापर्यंतच्या सर्व अ‍ॅनिमेडेट चित्रपटांचे कमाईचे रेकॉर्ड ब्रेक करून नवा रेकॉर्ड तयार केला.

rocky handsome v/s batman v/s superman
रॉकी हॅण्डसम v/s बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन
व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर १२ फेब्रुुवारी रोजी रिलीज झालेला कॅटरिना कैफ आणि आदित्य कपूर यांच्या ‘फितूर’ या चित्रपटाला देखील हॉॅलिवूडच्या ‘बॅटमॅन वर्सेस सुुपरमॅन’ व ‘डेडपूल’ या चित्रपटांचा फटका बसला. वास्तविक फितूरने चांगली ओपनिंग केली होती. मात्र केवळ १९ कोटी रुपयांपर्यंत या चित्रपटाला मजल मारता आली. त्या तुलनेत बॅटमॅन वर्सेस सुपरमॅनने एकाच आठवड्यात ३६ कोटी रुपयांचा गल्ला जमविला तर डेडपुलने २९ कोटी रुपये कमाविले. या चित्रपटांच्या फाईटमध्ये जॉन इब्राहमची मुख्य भूमिका असलेला ‘रॉकी हॅँडसम’ या चित्रपटाला सपाटून मार खावा लागला. 

sarbjit v/s x-manसरबजीत v/s  एक्स मॅन : एपाकलिप्स
बºयाच कालावधीनंतर बायोपिकमधून एंट्री करणाºया ऐश्वर्या रॉय बच्चन यांच्या ‘सरबजीत’ या चित्रपटाकडून बॉॅलिवूडमध्ये कमाईच्या बºयाच अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. अपेक्षेप्रमाणे चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात २२ कोटी रुपयांचा गल्ला देखील जमविला. मात्र याच दरम्यान रिलीज झालेल्या ‘एक्स मॅन : एपाकलिप्स’ या हॉॅलिवूडपटाने सरबजित चित्रपटाची घौडदौड थांबविली. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात २६ कोटी रुपयांचा गल्ला जमविल्याने सरबजीतला अपयश स्वीकारावे लागले. असाच फटका ‘द अ‍ॅग्री बर्ड मूवी’ या चित्रपटाने राधिका आपटे हिचा ‘फोबिया’, ‘वीरप्पन’ आणि ‘वेटिंग’ या चित्रपटांना दिला. 

capton america
‘कॅप्टन अमेरिका’ अर्धा डजन बॉलिवूडपटांवर भारी
वरुन धवनचा आवाज असलेल्या ‘कॅप्टन अमेरिका : सिव्हील वॉर’ या चित्रपटाने बॉॅलिवूडच्या तब्बल अर्धा डझन चित्रपटांना धोबीपछाड दिले. या चित्रपटाने ५९ कोटी रुपयांचा गल्ला जमविताना बेबो आणि अर्जुन कपूरची भूमिका असलेला ‘की अ‍ॅण्ड का’, प्रियंका चोपडा हिचा ‘जय गंगाजल’ अजहरुद्दीनचा बायोपिक असलेला इमरान हाशमीचा ‘अजहर’ आणि अमिताभ बच्चन यांचा ‘वंजीर’ या चित्रपटाना पॅक अप करण्यास भाग पाडले. तसेच या दरम्यान रिलीज झालेल्या ‘कुंग फू पांडा-३’  या अ‍ॅनिमेटेड चित्रपटाने देखील ३२ कोटी रुपयांची कमाई करून बॉॅलिवूड चित्रपटाना दणका दिला.

Web Title: Hollywood footsteps hit Hollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.