Holi special : भांग खाताच रणदीप हुड्डाला लागले गरगरायला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2017 19:36 IST2017-03-13T14:04:16+5:302017-03-13T19:36:04+5:30
कॉलेज डेज आठवले की, अनेक किस्से डोळ्यासमोर येतात. असाच काहीसा किस्सा अभिनेता रणदीप हुड्डा याने सांगितला आहे. बॉलिवूडमध्ये स्वत:चे ...
.jpg)
Holi special : भांग खाताच रणदीप हुड्डाला लागले गरगरायला!
क लेज डेज आठवले की, अनेक किस्से डोळ्यासमोर येतात. असाच काहीसा किस्सा अभिनेता रणदीप हुड्डा याने सांगितला आहे. बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करणाºया या अभिनेत्याचा हा किस्सा वाचाल तर तुम्हाला हसू आवरता येणार नाही. रणदीपने सांगितले की, कॉलेज जीवनात असताना होळीच्या दिवशी भांग खाल्ली होती, मग काय काही मिनिटांतच गरगरायला लागले. जवळ असलेल्या एका बेडवर झोपून घेतलं, मात्र झोपेत त्याला असं वाटत होतं की, तो बेडवर नव्हे तर बेड त्याच्या अंगावर आहे.
होळीच्या निमित्ताने रणदीपने आठवणींना उजाळा देताना हा किस्सा सांगितला. हा किस्सा सांगताना रणदीपची हालत बघण्यासारखी होती. तो म्हणाला की, कॉलेज जीवनातला हा प्रसंग आठवला की, आजही गरगरायला लागते. यावेळी रणदीपने आणखी असाच काहीसा मजेशीर किस्सा सांगितला. तो म्हणाला, लहानपणी होळीच्याच दिवशी कारण नसताना मला दोरीच्या चाबकाचे फटके खावे लागले होते. कारण मला माहीत नव्हते की, पंजाबमध्ये होळी कशी खेळली जाते. त्यावेळी माझे वय केवळ सात वर्ष इतके होते. त्याचे झाले असे की, होळीच्या दिवशी मी माझ्या काकाच्या गावी गेलो होतो. त्या गावात सर्व लोक एकमेकांवर पाणी फेकतात. त्यानंतर दोरीच्या चाबकाने एकमेकास फटके मारतात. मी जसा गावात पोहचलो त्याचवेळी एक महिला चाबूक घेऊन माझ्या काकाच्या दिशेने धावत आली. हे बघताच काका पळून गेले. मात्र तिच्या तावडीत मी सापडलो अन् तिने मलाच फटके मारले. यामुळे तब्बल एक आठवडा माझा पाय सुजलेला होता, ज्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले.
![]()
रणदीपने लहानपणीच नव्हे तर तारुण्यातदेखील होळीचा भरपूर आनंद घेतला आहे. एकदा कॉलेजमध्ये मित्राने मला भांग असलेले समोसे खायला दिले होते. त्यानंतर माझी स्थिती खूपच घराब झाली होती. मी काही मिनिटांतच बेडवर झोपून घेतले. मात्र यावेळी माझा पाय वर राहिला होता. कित्येक तास मी अशाच पोजिशनमध्ये बेडवर पडून होतो. जेव्हा भांग उतरली तेव्हा मात्र पाय सरळ करताना चांगलाच त्रास सहन करावा लागला. त्यानंतर मला समजले की, होळीच्या दिवशी दिले जाणारे समोसे कमीच खायला हवे. रणदीपचे हे दोन्ही किस्से होळी सणाला होत असलेल्या मजेशीर गमतींची आठवण करून देतात, हे मात्र नक्की.