Holi Special : आमिर खानचे ‘होळी’ कनेक्शन तुम्हाला माहीत आहे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2017 20:19 IST2017-03-13T14:49:09+5:302017-03-13T20:19:09+5:30

होळी हा असा सण आहे जो बॉलिवूडमध्ये सर्वाधिक जोरात सेलिब्रेट केला जातो. काही सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्यातही या दिवसाचे कनेक्शन ...

Holi special: Do you know Aamir Khan's 'Holi' connection? | Holi Special : आमिर खानचे ‘होळी’ कनेक्शन तुम्हाला माहीत आहे काय?

Holi Special : आमिर खानचे ‘होळी’ कनेक्शन तुम्हाला माहीत आहे काय?

ळी हा असा सण आहे जो बॉलिवूडमध्ये सर्वाधिक जोरात सेलिब्रेट केला जातो. काही सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्यातही या दिवसाचे कनेक्शन आहे. त्यातीलच एक सेलिब्रेटी म्हणजे आमिर खान हा होय. ज्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये होळीचा सण महत्त्वपूर्ण आहे. नेमके हे कनेक्शन काय? याविषयीच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 



आमिर खानच्या ‘होली’ या सिनेमातील प्रसंग
अगोदर त्याची ‘प्रोफेशनल लाइफ आणि होळी’ हे कनेक्शन जाणून घेऊया. सगळ्यांना माहीत आहे की, आमिरने ‘कयामत से कयामत’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. मात्र हे खरं नाही. कारण ‘कयामत से कयामत’ हा त्याचा पहिला यशस्वी सिनेमा असल्याचे आपण म्हणू शकतो. फुलफ्लेजेड अ‍ॅक्टर म्हणून त्याचा पहिला सिनेमा हा ‘होली’ आहे, जो १९८४ मध्ये रिलीज झाला होता. केतन मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात आमिर कॉलेज स्टुडंटच्या भूमिकेत होता. त्यावेळी आमिरचे वय केवळ १९ वर्ष इतके होते. या सिनेमात आमिरचा मित्र म्हणून आशुतोष गोवारीकर यांनी भूमिका साकारली होती. थोडक्यात ‘होली’मधून आमिरच्या करिअरची सुरुवात झाली. या सिनेमाची संपूर्ण कथा होळी या उत्सवावर आधारित आहे. 



​‘मंगल पांडे’ या सिनेमातील होळीवर आधारित असलेल्या गाण्यावर थिरकताना आमिर खान आणि राणी मुखर्जी...
याव्यतिरिक्त आमिरचे दुसरे होळी कनेक्शन थेट त्याच्या लाइफशी संबंधित आहे. २००५ मध्ये आलेल्या ‘मंगल पांडे : द रायजिंग’ या सिनेमातील एक गाणे चक्क आमिरने गायले आहे. या गाण्यात आमिर अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्याबरोबर होळी खेळताना बघावयास मिळाला होता. या गाण्याचे वैशिष्ट्ये म्हणजे आमिरने यातील काही कडवे गायले आहेत. आमिरच्या संपूर्ण करिअरमध्ये होळीचे हे एकमेव गाणे त्याच्या नावावर आहे. हे गाणे चित्रित करण्यासाठी तब्बल चार दिवस लागले होते. त्याचबरोबर आमिरने एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘लगान’ या सिनेमाच्या शूटिंगवेळी सेटवर जोरदार होळी सेलिब्रेशन करण्यात आले होते. त्याचवेळी पत्नी किरण राव हिच्याशी भेट झाली होती. पुढे या भेटीचे लग्नात रूपांतर झाले. त्यामुळे आमिरच्या आयुष्यात होळीचे नेहमीच महत्त्व राहिले आहे. 

Web Title: Holi special: Do you know Aamir Khan's 'Holi' connection?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.