​ ‘बेगम जान’च्या सेटवर अशी रंगली होळी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2017 10:04 IST2017-03-12T04:34:23+5:302017-03-12T10:04:23+5:30

विद्या बालनचा ‘बेगम जान’ हा आगामी सिनेमा पाहण्यास तुम्ही आम्ही सगळेच उत्सूक आहोत. अलीकडे या चित्रपटाचे काही पोस्टर्स जारी ...

Holi Holi on the sets of Begum Jan! | ​ ‘बेगम जान’च्या सेटवर अशी रंगली होळी!!

​ ‘बेगम जान’च्या सेटवर अशी रंगली होळी!!

द्या बालनचा ‘बेगम जान’ हा आगामी सिनेमा पाहण्यास तुम्ही आम्ही सगळेच उत्सूक आहोत. अलीकडे या चित्रपटाचे काही पोस्टर्स जारी केली गेलीत. ती पाहून तर ‘बेगम जान’बद्दलची उत्सूकता आणखीच वाढली आहे. त्यातच या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो समोर आले आहेत, तेही होळीच्या खास मुहूर्तावर. होय, या फोटोत‘बेगम जान’च्या सेटवर विद्या व ‘बेगम जान’ची संपूर्ण स्टारकास्ट धम्माल होळी खेळताना दिसत आहे. ‘बेगम जान’च्या एका होली साँगचे शूटींग अलीकडे पार पडले. त्याचेच हे फोटो. होळीवर आधारित गाणे म्हटल्यानंतर रंग उधळले जाणारच. शूटींगच्या बहाण्याने रंग खेळण्याची संधी कोण कशी चुकवणार. मग काय, ‘बेगम जान’च्या सेटवर मस्तपैकी होळी खेळली गेली.





‘बेगम जान’मधील होळीवरचे हे गाणे अनु मलिक यांनी कम्पोज केले आहे. हा चित्रपट ‘राजकहिनी’ या बंगाली चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाच्या बंगाली व्हर्जनमध्ये रितुपर्णा सेनगुप्ता दिसली होती. हिंदी रिमेकमध्ये ही भूमिका विद्या साकारताना दिसणार आहे. स्वातंत्र्यापूर्वी झालेल्या फाळणीकाळातील ही कथा आहे. चित्रपटाची कथा एका कुंठणखान्याच्या अवती-भवती फिरणारी आहे. भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान देहविक्रय व्यवसायात फसलेल्या महिलांच्या आयुष्यातील उलथा-पालथ या चित्रपटातून पडद्यावर दिसणार आहे. सर्वात विशेष म्हणजे, यात एक नाही, दोन नाही तर तब्बल ११ अभिनेत्री दिसणार आहे. विद्या बालन, नसिरुद्दीन शहा, रजत कपूर व गौहर खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला बेगम जान हा चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी याने केले असून हा चित्रपट १४ एप्रिलला रिलीज केला जाणार आहे. निमार्ता महेश भट्ट व मुकेश भट्ट यांच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेला ह्यबेगम जानह्णच्या माध्यमातून दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी बॉलिवूडमध्ये पर्दापण करीत आहेत. इला अरूण, पल्लवी शारदा, रजीत कपूर, आशिष विद्यार्थी, पूनम सिंग राजपूत, रिधीमा तिवारी, फ्लोरा सैनी, प्रियांका सेटिया, मिश्टी चक्रवर्ती, राजेश शर्मा आदींच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.  अभिनेता चंकी पांडे दीर्घकाळानंतर या चित्रपटात दिसणार आहे. तो यात एका निगेटीव्ह रोलमध्ये आहे.  
 

Web Title: Holi Holi on the sets of Begum Jan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.