Holi Celebration: चिमुकल्या तैमूरचा रंग खेळण्यासाठी हट्ट, बाललीला कॅमे-यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 12:00 IST2019-03-21T11:53:00+5:302019-03-21T12:00:06+5:30

हातात पिचकारी घेत तो इतरांवर रंग उडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे कॅमे-यात त्याच्या विविवध अदा कॅप्चर झाल्या आहेत.

Holi Celebration: Thimur ki tamoor ke banana hata, Baalila kame-in captivity | Holi Celebration: चिमुकल्या तैमूरचा रंग खेळण्यासाठी हट्ट, बाललीला कॅमे-यात कैद

Holi Celebration: चिमुकल्या तैमूरचा रंग खेळण्यासाठी हट्ट, बाललीला कॅमे-यात कैद

बॉलीवुडमध्ये स्टार किड्समध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असणारा आणि ज्याच्याविषयी प्रत्येकालाच जाणून घ्यायचं तो म्हणजे तैमूर. बॉलीवुडचा छोटे नवाब आणि बेगम करीना यांची जान म्हणजे त्यांचा लेक तैमूर. त्याच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा असते. बेगम आणि नवाब तर आपल्या लाडक्या लेकाचे हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यामुळे तैमूरच्या बाललीला सध्या प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरतोय. तैमुर प्रत्येक सण मस्त एंजाॅय करत असल्याचे पाहायला मिळाले. मग होळी सेलिब्रेशन तरी कसे मागे राहणार. करीना कपूरचा वंडरबॉय असलेल्या तैमूर सध्या रंगाची उधळण करण्यात मग्न असल्याचे पाहायला मिळतंय. नेहमीप्रमाणे तो त्याची आया नैनीसोबत रंगपंचमीची मजा लुटत आहे. हातात पिचकारी घेत तो इतरांवर रंग उडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे कॅमे-यात त्याच्या विविवध अदा कॅप्चर झाल्या आहेत. त्यामुळे होळी सेलिब्रेशनमध्ये तैमुरच्या या बाललीला लक्षवेधी ठरत आहेत.

 


तसेच कपूर फॅमिली होळी सेलिब्रेशन करत नाही. त्याला कारण म्हणजे 1988 होळीच्या दिवशी राज कपूर यांचे  निधन झाले होते.त्यामुळे तेव्हापासून कपूर फॅमिली होळीचे सेलिब्रेशन करत नाही.  पूर्वी आरके स्टूड‍ियोमध्ये खूप मोठ्या जल्लोषाच होळीचे सेलिब्रेश व्हायचे.पृथ्वीराज कपूर यांनी सुरू केलेली होळी सेलिब्रेशनची परंपरा राज कपूरपर्यंत होती. मात्र राज कपूर यांच्या निधनानंतर होली सेलिब्रेशन कपूर फॅमिलीने बंद केले.
 

Web Title: Holi Celebration: Thimur ki tamoor ke banana hata, Baalila kame-in captivity