या सुपरहिट मल्यालम सिनेमाचाही होणार हिंदी रिमेक,शूटिंगलाही लवकरच होणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 14:22 IST2018-06-05T08:52:45+5:302018-06-05T14:22:57+5:30

गाजलेल्या सिनेमांचा रिमेक बनणं ही काही नवी गोष्ट नाही.आजवर हिंदी चित्रपटसृष्टीत विविध गाजलेल्या सिनेमांचे रिमेक बनले आहेत.आता पुन्हा एकदा ...

The Hindi remake of this super hit Malayalam movie will also start soon, too | या सुपरहिट मल्यालम सिनेमाचाही होणार हिंदी रिमेक,शूटिंगलाही लवकरच होणार सुरुवात

या सुपरहिट मल्यालम सिनेमाचाही होणार हिंदी रिमेक,शूटिंगलाही लवकरच होणार सुरुवात

जलेल्या सिनेमांचा रिमेक बनणं ही काही नवी गोष्ट नाही.आजवर हिंदी चित्रपटसृष्टीत विविध गाजलेल्या सिनेमांचे रिमेक बनले आहेत.आता पुन्हा एकदा आणखी एका रिमेकची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.एखादा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला की वेगवेगळ्या भाषांत या चित्रपटांच्या रिमेक चा विचार केला जातो.दाक्षिणात्य सिनेमाचा विषय, सेट्स, एक्शन सीन्स, गाणी सारं सारं काही डोळे दिपवणारं असंच असते. त्यामुळे बॉलिवूडलाही दाक्षिणात्य सिनेमाची भुरळ पडल्याची अनेक उदाहरणं आहेत.इतकेच नाहीतर रिमेक बनलेल्या सिनेमांनी तिकीट खिडकीवर नवनवे कमाईचे रेकॉर्ड्स रचले आहेत. अनेक दाक्षिणात्य सिनेमांचे रिमेक हिंदीत बनले आहे. इतकंच नाही तर दाक्षिणात्य दिग्दर्शकांना आकर्षित करुन हिंदी सिनेमांची निर्मिती करण्याची बॉलिवूडमध्ये जणू काही स्पर्धा सुरु झाली आहे.असाच एक डिसेंबर 2017 मध्ये आलेला सुपरहिट मल्यालम चित्रपट 'मायानाधी'... पद्मराजन पुरस्करांसारख्या अनेक नामांकित पुरस्कारांवर आपले नाव कोरणाऱ्या या चित्रपटाला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद बघता या चित्रपटाचाही रिमेक करण्याचा विचार 'लव यू' सोनियो चे दिग्दर्शक जो राजन यांनी  केला आहे.या सिनेमाच्या शूटिंगलाही लवकरच सुरुवात होणार आहे.

'मायानाधी' चित्रपटाचं यश साजरं करण्यासाठी भेटलेल्या या टीमने साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या उपस्थितीत या चित्रपटाच्या रिमेकची घोषणा केली आहे.यावेळी मायानाधी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे टोविनो थॉमस उपस्थित होते तर या चित्रपटाचा रिमेक करण्यासाठी उत्सुक असलेले जो राजन आणि सचिन पिळगांवकरांनीही या सक्सेस पार्टीला हजेरी लावली होती. मल्यालम मायानाधी चे निर्माते संतोष कुर्विल्ला आणि आशिक अबु हिंदी रिमेकची ही निर्मिती करणार आहेत तर त्यांच्या जोडीला हिंदी रिमेकसाठी निर्माते म्हणून सचिन पिळगांवकर पुढे सरसावले आहेत. आशिक अबु दिग्दर्शित या मल्यालम कलाकृतीच्या हिंदी रिमेकचं दिग्दर्शन लव्ह यू सोनियो चे दिग्दर्शक जो राजन करणार आहेत.या चित्रपटाच्या पटकथेची उत्कंठावर्धक बांधणी, टोविनो थॉमस आणि ऐश्वर्या लेक्ष्मी यांच्यातील फ्रेशनेस या सगळ्यांचीच हिंदीत होणारी मांडणी पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: The Hindi remake of this super hit Malayalam movie will also start soon, too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.