'हिंदी मीडियम २' चित्रपटात करीना कपूर पहिल्यांदाच करणार 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 04:29 PM2019-03-30T16:29:14+5:302019-03-30T16:31:44+5:30

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान लवकरच 'हिंदी मीडियम' चित्रपटाच्या सीक्वलमध्ये इरफान खानसोबत झळकणार आहे. या चित्रपटात ती करियरच्या एकोणवीस वर्षात जी भूमिका केली नाही ती भूमिका करताना दिसणार आहे.

In 'Hindi Medium 2', Kareena Kapoor plays the role of 'only' for the first time | 'हिंदी मीडियम २' चित्रपटात करीना कपूर पहिल्यांदाच करणार 'ही' भूमिका

'हिंदी मीडियम २' चित्रपटात करीना कपूर पहिल्यांदाच करणार 'ही' भूमिका

googlenewsNext


बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान लवकरच 'हिंदी मीडियम' चित्रपटाच्या सीक्वलमध्ये इरफान खानसोबत झळकणार आहे. या चित्रपटात ती करियरच्या एकोणवीस वर्षात जी भूमिका केली नाही ती भूमिका करताना दिसणार आहे.  
सूत्रांच्या माहितीनुसार, 'हिंदी मीडियम २' चित्रपटात करीना पोलिस अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी करीना खूप उत्सुक आहे. करिना गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या भूमिका करताना दिसते आहे. २०१८ साली 'वीरे दी वेडिंग' चित्रपटात ती फेमिनिस्ट भूमिकेत दिसली होती. 

'हिंदी मीडियम २' चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले. कारण इरफान खान बरेच दिवस लंडनमध्ये कर्करोगावर उपचार घेत होता. आता बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर तो या चित्रपटातून कमबॅक करतो आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला एप्रिलमध्ये सुरूवात होणार आहे. करीना मे अखेरीस लंडनमध्ये शूटिंगला सुरूवात करणार आहे.


'हिंदी मीडियम' चित्रपटाच्या सीक्वलचे शीर्षक इंग्लिश मीडियम ठेवले असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाची कथा इरफान खानची मुलगी इग्लंडमध्ये शिकण्यासाठी जाते आणि तिथे तिला शिक्षणासाठी येणाऱ्या समस्येवर चित्रपट भाष्य करतो.

‘हिंदी मीडियम’ चित्रपटातील इरफानच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. पाकिस्तानी अभिनेत्री सबा कामर यात इरफानसोबत मुख्य भूमिकेत होती. भारत आणि चीन या दोन्ही देशात या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती. 


इरफानच्या कॅन्सरचे निदान होण्यापूर्वीच म्हणजेच, फेब्रुवारी २०१८ मध्येच ‘हिंदी मीडियम’च्या सीक्वलची घोषणा झाली होती. होमी अदजानिया हा चित्रपट दिग्दर्शित करणार असेही जाहीर करण्यात आले होते. पण इरफानच्या प्रकृतीमुळे हा चित्रपट लांबणीवर टाकण्यात आला होता. त्यानंतर मेकर्सनी इरफारनकडे या चित्रपटाचा विषयही काढला नव्हता. पण इरफानच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा होताच, मेकर्सनी त्याची भेट घेतली.

Web Title: In 'Hindi Medium 2', Kareena Kapoor plays the role of 'only' for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.