'जिसकी बीवी लंबी उसका भी बड़ा नाम है'; बायकोसोबत फोटो काढण्यासाठी हिमेशची धडपड; 'या' कृतीमुळे झाला ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 12:51 IST2022-03-13T12:51:37+5:302022-03-13T12:51:57+5:30

Himesh reshammiya: पत्नीसोबत फोटो काढण्याच्या नादात त्याने जे कृत्य केलं  ते पाहून नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवली आहे.

himesh reshammiya trolled for matching wife sonia height gets trolled | 'जिसकी बीवी लंबी उसका भी बड़ा नाम है'; बायकोसोबत फोटो काढण्यासाठी हिमेशची धडपड; 'या' कृतीमुळे झाला ट्रोल

'जिसकी बीवी लंबी उसका भी बड़ा नाम है'; बायकोसोबत फोटो काढण्यासाठी हिमेशची धडपड; 'या' कृतीमुळे झाला ट्रोल

आपल्या सुमधूर आवाजाने अनेक कानसेनांना तृप्त करणारा गायक, संगीतकार हिमेश रेशमिया (himesh reshammiya) सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. सध्या त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पत्नीसोबत फोटो काढण्याच्या नादात त्याने जे कृत्य केलं  ते पाहून नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवली आहे. इतकंच नाही तर त्याच्या कमी उंचीमुळे त्याला ट्रोलही केलं आहे.

अलिकडेच हिमेश आणि त्याच्या पत्नीला सोनियाला मुंबई विमानतळाबाहेर स्पॉट करण्यात आलं. यावेळी हिमेशला पाहिल्यानंतर अनेक जण या कपलचा फोटो घेण्यासाठी पुढे सरसावले. विशेष म्हणजे हिमेशची पत्नी त्याच्यापेक्षा उंचीने थोडी जास्त असल्यामुळे हिमेशने चक्क त्याच्या टाचा उंचावून तिच्यासोबत फोटोसाठी पोझ दिली.

'कधीही टॉम क्रूझला निकोल किडमॅनसोबत असं एकत्र पाहिलं नाही', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'कोणीही टॉम क्रुझप्रमाणे स्वत:ला कॅरी करु शकत नाही', अशा असंख्य कमेंट हिमेशच्या व्हिडीओवर नेटकरी करत आहेत. 

दरम्यान, अलिकडेच हिमेश सा रे गा मा पा या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकाची भूमिका साकारत होता. यापूर्वी त्याने  'सारेगामापा चॅलेंज', 'द वॉइस इंडिया' आणि 'सुपरस्टार सिंगर' या कार्यक्रमांमध्येही परिक्षकाचं काम केलं आहे. 

Web Title: himesh reshammiya trolled for matching wife sonia height gets trolled