ही अभिनेत्री आहे हिमेश रेशमियाची दुसरी पत्नी, २२ वर्षांच्या संसारानंतर पहिल्या पत्नीला दिला होता घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 19:49 IST2019-07-24T19:46:05+5:302019-07-24T19:49:43+5:30
हिमेश रेशमियाची पत्नी एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

ही अभिनेत्री आहे हिमेश रेशमियाची दुसरी पत्नी, २२ वर्षांच्या संसारानंतर पहिल्या पत्नीला दिला होता घटस्फोट
सिंगर, अॅक्टर, म्युझिक डायरेक्टर अशी हिमेश रेशमियाने त्याची ओळख बॉलिवूडमध्ये निर्माण केली आहे. त्याचा नुकताच वाढदिवस झाला. त्याचा वाढदिवस त्याची पत्नी सोनियाने खूपच चांगल्याप्रकारे साजरा केला. गुजरातमध्ये जन्मलेल्या हिमेशने आपल्या वडिलांच्या आग्रहाखातर करिअर म्हणून संगीत क्षेत्राची निवड केली. वयाच्या १६ व्या वर्षी दूरदर्शनवरून त्याचा हा प्रवास सुरू झाला. सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटातून त्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या तेरे नाम या चित्रपटामुळे मिळाली. संगीत दिग्दर्शक म्हणून आपली ओळख निर्माण केल्यानंतर त्याने आशिक या चित्रपटाद्वारे गायकीला सुरुवात केली.
तुम्हाला माहीत आहे का, हिमेश रेशमियाची पत्नी एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. हिमेशचे लग्न सोनिया कपूरसोबत झालेले असून त्याचे हे दुसरे लग्न आहे. हिमेश आणि सोनियाच्या अफेअरची चर्चा मीडियात असली तरी त्यांनी त्यांचे नाते कधीच स्वीकारले नव्हते. त्यांनी मे २०१८ ला अचानक लग्न करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांनी धुमधडाक्यात लग्न न करता कोर्ट मॅरेज करणे पसंत केले होते.
हिमेशने सोनियासोबत लग्न करण्यासाठी त्याची पहिली पत्नी कोमलसोबत लग्नाच्या २२ वर्षानंतर घटस्फोट घेतला. हिमेश आणि कोमलला स्वयम नावाचा मुलगादेखील आहे. हिमेश आणि कोमलच्या घटस्फोटाला सोनिया कारणीभूत असल्याची चर्चा त्यावेळी मीडियात चांगलीच रंगली होती. हिमेश लग्नाआधी सोनियासोबत लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे देखील म्हटले जाते.
२००६ पासून हिमेश आणि सोनियाच्या अफेयरची मीडियात चर्चा सुरू होती. पहिले चार वर्षे तर हिमेशने त्याच्या घरच्यांना तिची ओळख केवळ ‘चांगली मैत्रिण’ अशीच करून दिली होती. पण काही काळाने त्यांच्या नात्याविषयी त्याच्या घरातल्यांना कळले. त्यामुळे कुटुंबियांच्या विरोधामुळे काही काळासाठी ते दोघे एकमेकांपासून दूर ठेवले. परंतु हिमेशच्या वडिलांच्या निधनानंतर ते पुन्हा एकत्र आले. कोमलला सोनिया आणि हिमेशच्या नात्याविषयी पूर्ण कल्पना होती. तरीपण तिने कधीच त्याला उघडपणे विरोध केला नाही असे देखील म्हटले जाते.