​हिमेशने तोडली शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 08:42 IST2016-03-07T15:42:42+5:302016-03-07T08:42:42+5:30

‘आपका सुरुर’ या चित्रपटाचा सिक्वेल ‘तेरा सुरुर’ या अपकमिंग चित्रपटामुळे गायक, संगीत दिग्दर्शक व अभिनेता हिमेश रेशमिया पुन्हा एकदा ...

Hey Monday broke his oath | ​हिमेशने तोडली शपथ

​हिमेशने तोडली शपथ

पका सुरुर’ या चित्रपटाचा सिक्वेल ‘तेरा सुरुर’ या अपकमिंग चित्रपटामुळे गायक, संगीत दिग्दर्शक व अभिनेता हिमेश रेशमिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटात प्रेक्षक मला एका नव्या रूपात पाहतील, असे हिमेश सांगत सुटला आहे. निश्चितपणे हे खरे आहे. कारण या चित्रपटासाठी हिमेशने तब्बल २० किलो वजन कमी केले. शिवाय यादरम्यान त्याला त्याने घेतलेली एक शपथही मोडावी लागली. शपथ मोडली गेल्याने हिमेशला वाईट वाटतेय. पण खरोखरीच, त्याच्याकडे याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. ‘तेरा सुरुर’ची शुटींग आयर्लंडच्या डबलिनमध्ये झाली. येथे कडाक्याची थंडी होती. ब्रांडी पिल्याशिवाय इतक्या कडाक्याच्या थंडीत शुटींग करणे अशक्य  होते. त्यामुळे मद्यपान न करण्याची शपथ तोडण्याशिवाय हिमेशकडे कुठलाही पर्याय नव्हता. एका सीनमध्ये तर हिमेशला अगदी पारदर्शक कपडे घालून शुटींग करायचे होते. मग काय, हिमेशने ब्रांडीचा एक पेला रिचवला अन् केले शुटींग...तुम्हीच सांगा..बिच्चारा दुसरे काय करणार???

Web Title: Hey Monday broke his oath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.