Priyanka Nick Wedding : तर असा आहे प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा वेडिंग प्लॉन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 16:30 IST2018-11-27T16:25:05+5:302018-11-27T16:30:31+5:30
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नानंतर सगळ्यांचे लक्ष लागलंय ते प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाकडे. सध्या दोघांच्या लग्नाची जोधपूरमध्ये जोरदार तयारी सुरु आहे.

Priyanka Nick Wedding : तर असा आहे प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा वेडिंग प्लॉन
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नानंतर सगळ्यांचे लक्ष लागलंय ते प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाकडे. सध्या दोघांच्या लग्नाची जोधपूरमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवळचे नातेवाईक लग्नात सहभागी होणार आहेत.
नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार प्रियांकाने 28 नोव्हेंबरला एक पूजा ठेवली आहे. ऐवढचे नाही तर हे कपल 4 डिसेंबरला ग्रँड वेडिंग रिसेप्शन दिल्लीत देणार असल्याचे कळतेय.
नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार प्रियांका आणि निक आपल्या लग्नाच्या सेलिब्रेशनला घेऊन खूपच उत्साही आहेत. दिल्लीतल्या रिसेप्शनसोबतच प्रियांका मुंबईतदेखील बी-टाऊनसाठी रिसेप्शन देणार आहे.
निक आणि प्रियांका दोघेही प्रचंड प्रसिद्ध असल्याने त्यांच्या लग्नाची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो एका इंटरनॅशनल पब्लिकेशनला त्यांनी १८ कोटीला विकले गेले असल्याचेही कळतेय. २९ नोव्हेंबरला प्रियांकाच्या हातांवर निकच्या नावाची मेहंदी रचेल. यानंतर ३० नोव्हेंबरला जोधपूरच्या मेहरानगड किल्लयात संगीत सेरेमनी होईल. याच दिवशी प्रियांका व निक कॉकटेल पार्टी होस्ट करतील. यात केवळ प्रियांका व निकचे जवळचे मित्र व नातेवाईक सामील होतील. १ डिसेंबरला हळदीचा कार्यक्रम होईल. २ डिसेंबरला प्रियांका व निक लग्नबंधनात अडकतील.२ डिसेंबरला हिंदू पद्धतीने तर ३ डिसेंबरला हे कपल ख्रिश्चन पद्धतीने रेशीमगाठीत अडकणार आहे. दोन्ही पद्धतीने लग्न एकाच ठिकाणी पार पडणार आहे. लग्नानंतर प्रियांका-निक दोन रिसेप्शन देतील.