जावई हाच हवा! ईशा देओलसाठी हेमा मालिनींना आवडायचा 'हा' अभिनेता, अभिनेत्रीने दिलेला नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:20 IST2025-12-25T13:19:28+5:302025-12-25T13:20:26+5:30
'या' दिग्गज अभिनेत्याचा मुलगा ईशासाठी योग्य जोडीदार असल्याचं हेमा मालिनींना वाटत होतं. पण...

जावई हाच हवा! ईशा देओलसाठी हेमा मालिनींना आवडायचा 'हा' अभिनेता, अभिनेत्रीने दिलेला नकार
अभिनेत्री ईशा देओलने हिंदी सिनेसृष्टीत काही मोजकेच हिट सिनेमे दिले. बिझनेसमन भरत तख्तानीसोबत लग्न करुन नंतर ती सिनेमांमधून गायब झाली. काही महिन्यांपूर्वीच भरत आणि ईशाचा घटस्फोट झाला. त्यांना दोन मुली आहेत ज्या आता ईशासोबतच राहतात. ईशाची आई अभिनेत्री हेमा मालिनी यांना लेकीचं लग्न एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लावायचं होतं. मात्र ईशा देओलने नकार दिला होता. कोण आहे तो अभिनेता?
'कॉफी विद करण' शोमध्ये हेमा मालिनी म्हणालेल्या की, "ईशासाठी मला अभिषेक बच्चन पसंत होता. तो माझा जावई व्हावा अशी माझी इच्छा होती. ईशासाठी तो योग्य जोडीदार आहे असं मला वाटायचं."
हेमा मालिनी यांचं अभिषेकचे आईवडील अमिताभ आणि जया यांच्यासोबत चांगलं नातं आहे. हेमा मालिनींची ही इच्छा ईशाने मात्र पूर्ण केली नाही. इंडियन फोरमला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणालेली की, "माझी आई खूपच प्रेमळ आहे. तिने अभिषेकचं नाव घेतलं कारण तेव्हा तो मोस्ट एलिजिबल बॅचलर होता. मी एका चांगल्या व्यक्तीसोबत सेटल व्हावं असं तिला वाटत होतं आणि तिच्या नजरेत अभिषेक बच्चन बेस्ट होता. पण मला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं. मला तो हसबंड मटेरियल वाटायचा नाही. मी त्याला एक मोठ्या भावासारखं समजायचे. सॉरी आई." अभिषेक बच्चनशिवाय हेमा मालिनींना ईशासाठी विवेक ओबेरॉयही पसंत होता. पण तो आपल्या टाईपचा नाही म्हणत ईशाने त्यालाही नकार दिला होता.
ईशा देओल सध्या सिंगल आयुष्य जगत आहे. गेल्या महिन्यात तिचे वडील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं. या धक्क्यातून ईशा आणि हेमा मालिनी अजूनही सावरलेल्या नाहीत. त्यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.