प्रेग्नेंट सोहा अली खानला वहिनी करिना कपूर देतेय हेल्थ टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 14:45 IST2017-05-17T09:15:04+5:302017-05-17T14:45:04+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान  सध्या ती प्रेगंन्सी एन्जॉय करते आहे. सोहाला तिच्या प्रेगन्सीसंबंधीच्या टीप्स दुसरे तिसरे कोणी देत नसून ...

Health Tips for giving pregnancy to Soha Ali Khan by her daughter Karina Kapoor | प्रेग्नेंट सोहा अली खानला वहिनी करिना कपूर देतेय हेल्थ टिप्स

प्रेग्नेंट सोहा अली खानला वहिनी करिना कपूर देतेय हेल्थ टिप्स

लिवूड अभिनेत्री सोहा अली खान  सध्या ती प्रेगंन्सी एन्जॉय करते आहे. सोहाला तिच्या प्रेगन्सीसंबंधीच्या टीप्स दुसरे तिसरे कोणी देत नसून तिची वहिनी करिना कपूर देतेय. सोहा सांगतेय करिना मला न्यूट्रिशनबाबत टिप्स देतेय. करिनाने मला सांगितले आहे प्रेगंन्सी दरम्यान कोणतेही डाएट करु नकोस. जे हवं असेल ते सगळे मनापासून खात जा.  
सोहाने ट्वीट केले आहे  येणाऱ्या नव्या पाहुण्याबाबत कुणाल आणि मी खूपच उत्सुक आहोत. आमच्या लग्नाला दोन वर्ष झाली आहेत, आता आयुष्याचे एक नवे पर्व सुरु होत आहे. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांमुळे आम्ही आणखीन खुश झालो आहोत. सोहा पुढे लिहितो, मी तशी नजर लागते या गोष्टीवर विश्वास नाही ठेवत मी याबाबतीत कोणतीच रिस्क घेऊ इच्छित नाही. तशीही मी आणि कुणाल आमचे पसर्नल लाइफ पर्सनल ठेवतो. 


कुणाल लिहितो, मी बाप होणार ही आनंदाची बाब गोष्ट मला सोहाने कधी सांगितले ते आठवत नाही. तो क्षण माझ्यासाठी खूपच इमोशनल होता म्हणूनच कदाचित मी लक्षात ठेवू शकलो नाही.   
सोहा आणि कुणालची ओळख ‘ढूंढते रह जाओगे’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. तीन वर्ष ते एकमेकांना डेट केल्यानंतर ते दोन वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. त्यानंतर ते विवाह बंधनात अडकले. पतौडींच्या घरी करिना आणि सैफच्या बाळाचे नुकतेच आगमन झाले आहे त्यामुळे सोहाच्या बाळाच्या आगमनानंतर हा आनंद द्विगुणीत होणार आहे. त्यामुळे आजी शर्मिला टागोर सोहाच्या बाळाची आतुरतेने वाट पाहात असतील यात काही शंका नाही. 

Web Title: Health Tips for giving pregnancy to Soha Ali Khan by her daughter Karina Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.