'त्याने माझ्या छातीला पकडलं आणि...', सोनम कपूरने सांगितला अंगावर काटा आणणारा 'तो' प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 17:01 IST2023-02-02T17:00:47+5:302023-02-02T17:01:13+5:30
Sonam Kapoor : सोनम कपूरबरोबर एका व्यक्तीने लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला होता.

'त्याने माझ्या छातीला पकडलं आणि...', सोनम कपूरने सांगितला अंगावर काटा आणणारा 'तो' प्रसंग
अभिनेत्री सोनम कपूर(Sonam Kapoor)ला बॉलिवूडची फॅशन क्वीन म्हटले जाते. सोनम ही बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी आहे. सोनम नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. एकदा सोनमने राजीव मसंदच्या शोमध्ये असा खुलासा केला होता, जो ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला होता. खरे तर, २०१६ मध्ये, जेव्हा सोनम राजीव मसंद यांच्या शो द एक्ट्रेसेस राऊंडटेबलमध्ये पोहोचली होती, तेव्हा तिने तिच्यासोबत झालेल्या लैंगिक छळाची कहाणी सांगितली होती. सोनमसोबतचा हा प्रसंग ऐकून राधिका आपटे, विद्या बालन, अनुष्का शर्मा आणि आलिया भटही हैराण झाल्या होत्या.
सोनम कपूरने सांगितले होते की, ती लहान असताना तिचे शोषणही झाले होते. वयाच्या १३ व्या वर्षी सोनमसोबत असेच काहीसे घडले होते, ज्यानंतर ती खूप घाबरली होती. सोनमने सांगितले की, जेव्हा ती तिच्या काही मैत्रिणींसोबत थिएटर फिल्म पाहण्यासाठी गेली होती तेव्हा तिच्यासोबत ही घटना घडली. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली होती की, "मागून एक माणूस आला आणि त्याने माझी छाती पकडली. साहजिकच, त्यावेळी मी लहान होते आणि मला छाती नव्हती. मी भीतीने थरथर कापू लागली. मला काही समजत नव्हते. काय होतंय. मी तिथेच उभी राहून रडायला लागले.
सोनम आपल्यासोबत झालेल्या लैंगिक छळाविषयी बोलताना रडू लागली. सोनम कपूरचा हा खुलासा ऐकून सगळेच हैराण झाले. सोनमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर ती सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. सोनम आणि आनंद आहुजा काही काळापूर्वी मुलगा वायुचे आई-वडील झाले आहेत. वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती शेवटची 'एके वर्सेस एके में नजर'मध्ये दिसली होती.