राखी सावंतचा होणाऱ्या पतीसोबत हायव्होल्टेज ड्रामा!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 13:00 IST2018-12-02T13:00:51+5:302018-12-02T13:00:57+5:30

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नानंतर आता प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे देखील लग्नाच्या बंधनात अडक ले आहेत. असं असताना बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत कशी मागे राहणार? तिनेही तिच्या लग्नाची तारीख ठरवली आहे. दीपक कलाल या यूट्यूब सेलिब्रिटीसोबत ती ३१ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे.

  Havoltage Drama with Rakhi Sawant's husband! | राखी सावंतचा होणाऱ्या पतीसोबत हायव्होल्टेज ड्रामा!!

राखी सावंतचा होणाऱ्या पतीसोबत हायव्होल्टेज ड्रामा!!

सध्या लग्नांचा मौसम सुरू आहे. रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नानंतर आता प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे देखील लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. असं असताना बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत कशी मागे राहणार? तिनेही तिच्या लग्नाची तारीख ठरवली आहे. दीपक कलाल या यूट्यूब सेलिब्रिटीसोबत ती ३१ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. आता ती चर्चेत आलीय ती म्हणजे एका व्हिडीओमुळे. हा व्हिडीओ एका प्रेसकॉन्सफरन्सचा आहे. जिथे राखीने तिच्या होणाऱ्या  पतीसोबत हायव्होल्टेज ड्रामा सुरू केला. 

सुत्रांनुसार, अलीकडेच राखी सावंतने एक प्रेसकॉन्फरन्स बोलावली. यादरम्यान तिचा होणारा पती दीपक कलाल आणि राखी सावंत यांनी नेहमीप्रमाणे ड्रामा सुरू केला. माध्यम प्रतिनिधींसमोर त्यांनी एकमेकांसोबत अश्लील भाषेत संवाद सुरू केला. यावेळी राखी म्हणाली,‘दीपिका पादुकोण हिने लग्नात १ कोटीचा लहंगा घातला होता, असे मी ऐकले, यानुसार तर मी माझ्या लग्नात ८ कोटींचा लहंगा घालायला पाहिजे.’ पुढे राखी म्हणते,‘लग्नानंतर मी आणि दीपक कलाल हे भाऊ-बहीण बनून राहणार आहोत. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये मी शाहरूख, सलमान, करिना आणि दीपिका यांना आमंत्रण दिले आहे. तसेच दीपक म्हणाला,‘आमच्या लग्नाचे बजेट जास्त नसून केवळ ७० कोटी आहे. त्यावर बोलता बोलता राखीने त्याला अडवत विचारले,‘त्यांनी ८५ कोटींचा उल्लेख केला होता, १५ कोटी कुठे गेले? त्यावर दीपकने म्हटले की, काही पैसा कपड्यांमध्ये खर्च झाला आहे.’ 

राखी सावंत ही बॉलिवूडची ड्रामा क्वीन असून तिला कायम चर्चेत राहायला प्रचंड आवडतं. त्यांनी अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले असून त्यांनी यात न्यूड वेडिंग करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तिने हे देखील सांगितले की, तिच्या लग्नात अमेरिके चे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप हे देखील येणार असल्याचे तिने सांगितले आहे.                        

Web Title:   Havoltage Drama with Rakhi Sawant's husband!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.