‘धडक’मधील ‘झिंग झिंग झिंगाट’ हे गाणे तुम्ही पाहिले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 14:52 IST2018-06-27T14:52:41+5:302018-06-27T14:52:41+5:30
जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या ‘धडक’ या चित्रपटाकडे सगळ्यांचे लक्ष लागले. श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी या चित्रपटाद्वारे बॉलिवूड ...

‘धडक’मधील ‘झिंग झिंग झिंगाट’ हे गाणे तुम्ही पाहिले?
ज न्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या ‘धडक’ या चित्रपटाकडे सगळ्यांचे लक्ष लागले. श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करणार असल्याने सगळ्यांचेच लक्ष तिच्या पर्दापणाकडे लागले आहे. खरे तर ‘धडक’च्या ट्रेलरमधून जान्हवीने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. आज या चित्रपटाचे दुसरे गाणे ‘झिंगाट’ रिलीज झाले. हे गाणं तुम्हाला ‘झिंग झिंग झिंगाट’ करायला लावणार, हे नक्की.
जान्हवी आणि ईशानने या गाण्यावर केलेला आगळावेगळा डान्स पाहिल्यानंतर तुम्हाला याची कल्पना करता येईल. तुम्ही ‘सैराट’ पाहिला असेल तर तुम्हाला एक गोष्ट आठवत असेलच की, ‘झिंग झिंग झिंगाट’ या गाण्यानंतरचं ‘सैराट’ची कथा एक वेगळे वळण घेते. आर्चीच्या घरच्यांना तिच्या पे्रमकथेबद्दल कळते. ‘धडक’मध्येही हेच दिसतेय. ‘झिंग झिंग झिंगाट’ हे ‘धडक’मधील गाणे अमिताभ भट्टाचार्य याने लिहिले आहे.
काही दिवसांपूर्वीचं ‘धडक’चा ट्रेलर रिलीज झाला होता. १० जूनला रिलीज झालेला हा ट्रेलर आत्तापर्यंत ५० लाखांवर लोकांनी पाहिला आहे. ‘धडक’ हा ‘सैराट’ या ब्लॉकबस्टर मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे, पण निश्चितपणे ‘सैराट’पेक्षा ‘धडक’चा बाज वेगळा आहे, हे ट्रेलर पाहून जाणवते.
चित्रपट राजस्थानी पार्श्वभूमीवर आधारित आहे. यात जान्हवी व ईशान खट्टर दोघेही राजस्थानी टोनमध्ये बोलताना दिसताहेत. ट्रेलरमधील जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर यांची केमिस्ट्रीही अफलातून आहे. चित्रपटातील अनेक सीन्स ‘सैराट’ची आठवण करून देतात.