गोविंदाच्या मुलाला पाहिलंत का? तो दिसतो अभिनेत्यापेक्षाही हॅण्डसम, नेटकरी म्हणाले - "चीची नं. २"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 15:36 IST2024-12-12T15:36:12+5:302024-12-12T15:36:41+5:30
Govinda And Son Yashvardhan Ahuja : गोविंदा ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता आहे. आता गोविंदा क्वचितच चित्रपटांमध्ये दिसत असला तरी त्याचे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. काही लोकांना त्यांचा मुलगा यशवर्धनला चित्रपटात पाहण्याची इच्छा आहे.

गोविंदाच्या मुलाला पाहिलंत का? तो दिसतो अभिनेत्यापेक्षाही हॅण्डसम, नेटकरी म्हणाले - "चीची नं. २"
गोविंदा (Actor Govinda) ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्या काळात गोविंदाचा प्रत्येक चित्रपट हिट झाला. करिश्मा कपूर, रवीना टंडन आणि राणी मुखर्जीसोबत गोविंदाची जोडी खूप आवडली होती. आता गोविंदा क्वचितच चित्रपटांमध्ये दिसत असला तरी त्याचे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. काही लोकांना त्यांचा मुलगा यशवर्धन(Yashvardhan Ahuja)ला चित्रपटात पाहण्याची इच्छा आहे. लूकच्या बाबतीत यशवर्धन त्याच्या वडिलांपेक्षा हॅण्डसम आणि डॅशिंग दिसतो.
यशवर्धन कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि हजारो लोक त्यांना फॉलो करतात. गोविंदाप्रमाणेच लोक यशवर्धनवरही खूप प्रेम करतात आणि त्याच्या नवीन फोटो आणि व्हिडिओंची आतुरतेने वाट पाहतात. यशवर्धनने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोमध्ये तो त्याच्या वडिलांसोबत दिसत आहे. यशवर्धन नुकताच इंडियन आयडॉलच्या सेटवर पोहोचला होता तेव्हाचा हा फोटो आहे. यावेळी तो वडिलांसोबत त्याच्या गाण्यांवर डान्स करतानाही दिसला. यशवर्धनला नाचताना पाहून चिचीच्या चाहत्यांनी त्याला लवकरात लवकर चित्रपटात येण्याची मागणी केली.
यशवर्धन लूकच्या बाबतीत सांगायचं तर कोणत्याही बॉलिवूड हिरोपेक्षा कमी नाही. त्याच्या या फोटोवर सोशल मीडिया यूजर्सच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. फोटोवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, "तू आगामी सुपरस्टार आहेस आणि तुझ्या वडिलांची कार्बन कॉपी आहेस." तर दुसऱ्याने लिहिले आहे, "वडिलांसारखा क्युट." आणखी एकाने लिहिले की, ''चीची नं. २''. अशाप्रकारे लोक यशवर्धनच्या फोटोवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.