एमी जॅक्सनचा हा बोल्ड अ‍ॅण्ड सेक्सी अंदाज तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 21:20 IST2017-02-05T15:49:09+5:302017-02-05T21:20:05+5:30

अभिनेत्री एमी जॅक्सन लवकरच एका लीडिंग मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकणार असून, त्यासाठी तिने अतिशय हॉट फोटोशूट केले आहे. या ...

Have you seen this bold and sexy guess of Amy Jackson? | एमी जॅक्सनचा हा बोल्ड अ‍ॅण्ड सेक्सी अंदाज तुम्ही पाहिला का?

एमी जॅक्सनचा हा बोल्ड अ‍ॅण्ड सेक्सी अंदाज तुम्ही पाहिला का?

िनेत्री एमी जॅक्सन लवकरच एका लीडिंग मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकणार असून, त्यासाठी तिने अतिशय हॉट फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये एमी बिकिनी अवतारात असून, तिचा लुक जबरदस्त हॉट अ‍ॅण्ड सेक्सी आहे. एमीने यातील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून, हे फोटो बघण्यासाठी फॅन्सकडून तुफान लाइक्स मिळत आहेत. 

एमी लवकरच रजनीकांत आणि अक्षयकुमार स्टारर ‘२.०’ या रोबोटच्या सिक्वलमध्ये झळकणार आहे. सूत्रानुसार ती सलमान खान याच्या ‘दबंग-३’ साठी अप्रोच झाली आहे. एमीने २०१२ मध्ये ‘एक दिवाना था’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सिनेमात तिने राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर याच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर एमीने ‘सिंग इज ब्लिंग’ (२०१५), फ्रीकी अली (२०१६) या सिनेमांमध्ये बघावयास मिळाली. त्याचबरोबर २०१६ मध्येच तिने ‘देवी’ या साउथ सिनेमामध्येही काम केले होते. 



आता ती रजनीकांत आणि अक्षयकुमारसारख्या बड्या स्टार्समुळे झळकणार असल्याने सध्या ती सातवे आसमानवर आहे. त्याचबरोबर काही दिवसांपासून तिचे नाव सलमान खान याच्याबरोबर जोडले गेले जात असल्याने ती लाइमलाइटमध्ये आहे. ‘२.०’ च्या पोस्टर लॉँचिंगप्रसंगी जेव्हा सलमानने अचानकपणेच त्याठिकाणी हजेरी लावली होती, तेव्हा तर चर्चेला अक्षरश: उधाण आले होते. 

सलमानला या इव्हेंटसाठी आमंत्रित केलेले नव्हते, अशात त्याने अचानकच हजेरी लावल्याने सगळेच आश्चर्यचकीत झाले होते. मात्र सलमानची ही अचानक हजेरी केवळ एमीसाठी असल्याची चर्चा त्यावेळेस रंगली होती. आता एमीने एका प्रसिद्ध मॅगझिनसाठी हॉट फोटोशुट केल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  

Web Title: Have you seen this bold and sexy guess of Amy Jackson?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.