तुम्ही कधी पाहिला आहे का माधवनचा ‘असा’ लूक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 15:16 IST2017-01-06T15:16:25+5:302017-01-06T15:16:25+5:30
आर. माधवन हे नाव चॉकलेट हीरोंच्या पंक्तीतले वाटते ना? अहो त्याचा पहिला हिंदी चित्रपट ‘रहना है तेरे दिले में’पासून ...

तुम्ही कधी पाहिला आहे का माधवनचा ‘असा’ लूक?
आ . माधवन हे नाव चॉकलेट हीरोंच्या पंक्तीतले वाटते ना? अहो त्याचा पहिला हिंदी चित्रपट ‘रहना है तेरे दिले में’पासून त्याची तशीच इमेज झाली आहे. पण आता तो त्याची तशी इमेज तोडू पाहत आहे.
नुकतेच त्याने त्यांच्या ‘विक्रम वेधा’ या आगामी तमिळी सिनेमातील लूक सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केली. या चित्रपटात तो डॅशिंग पोलिस अधिकऱ्याच्या रुपात दिसणार असून खलनायक विजय सेतूपतीसोबत दोन हात करणार आहे.
मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर त्याने फोटो शेअर करतना लिहिले की, ‘विक्रमादिथियन द कॉप इन ‘विक्रम वेधा’. पुश्कर-गायत्री दिग्दर्शित या सिनेमात माधवन इन्काउंटर स्पेशालिस्टच्या भूमिकेत आहे तर विजय सेतूपती गँगस्टरच्या रोलमध्ये आहे.
![Madhavan as Cop]()
हे दोन्ही दिग्गज कलाकार प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकत आहे. काही दिवसांपूर्वी ट्विट करून माधवनने विजयसोबत काम करण्याचा अनुभव शेअर करताना म्हटले होते की, विजय एक अत्यंत चांगला अभिनेता असून त्याच्यासोबत चित्रपट करायला मिळतेय म्हटल्यावर मी खूप एक्साटेड आहे. सिनेमात या दोघांव्यतिरिक्त श्रद्धा श्रीनाथ आणि वरलक्ष्मी शरद कुमार यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.
अनेक चित्रपटांत रोमॅण्टिक भूमिका केल्यानंतर माधवन सध्या प्रयोगशील चित्रपटांकडे वळाला आहे. ‘तनू वेड्स मनू २’च्या अफाट यशानंतर त्याने ‘साला खडूस’सारखा वेगळ्या धाटणीचा चित्रपट केला होता. तो म्हणतो, ‘वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करण्यातच खरी मजा आहे. तेचतेच करणे मला नाही आवडत. स्वत:ला एक अभिनेता म्हणून कायम जिवंत ठेवण्यासाठी मी ‘कम्फर्ट झोन’च्या बाहेर पडणे पसंत करतो.’
‘रंग दे बंसती’, ‘३ इडियट्स’, ‘१३ बी’ अशा वैविध्यपूर्ण सिनेमांसाठी तो ओळखला जातो.