'हसीन दिलरुबा ३' येतेय! तापसी पन्नू पुन्हा करणार धमाका, पण या वेळी सस्पेन्स डबल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 11:51 IST2025-05-06T11:50:59+5:302025-05-06T11:51:25+5:30
'हसीन दिलरुबा ३'साठी तापसी पन्नू पुन्हा सज्ज!

'हसीन दिलरुबा ३' येतेय! तापसी पन्नू पुन्हा करणार धमाका, पण या वेळी सस्पेन्स डबल!
Haseen Dillruba 3 : "पागलपन की हद तक न गुजरे वह प्यार ही कैसा..." असं म्हणत काही दिवसांपुर्वी अभिनेत्री तापसी पन्नू ही 'फिर आयी हसीन दिलरुबा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तापसी पन्नू आणि विक्रांत मेसीच्या सीक्वेलला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. यामध्ये विक्रांत आणि तापसी या जोडीसोबत सनी कौशलही दिसला. या थ्रिलर मिस्ट्री सीक्वेलमध्ये राणी (तापसी) आणि रिशू (विक्रांत) यांचा रोमान्स आणि भूतकाळात केलेल्या घटनांचा परिणाम पाहायला मिळाला. आता पुन्हा एकदा राणी आणि रिशू येत आहेत. 'हसीन दिलरुबा' आणि 'फिर आई हसीन दिलरुबा'नंतर आता 'हसीन दिलरुबा ३' येतेय.
'हसीन दिलरुबा ३' बद्दलचं अपडेट नुकतंच तापसी आणि लेखिका कनिका ढिल्लन यांनी दिलं आहे. एका मुलाखतीत तापसी आणि कनिका यांनी इशारा दिला की, "ही कहाणी अजून संपलेली नाही… अजून बरंच काही बाकी आहे" मिळालेल्या माहितीनुसार, 'हसीन दिलरुबा ३'ची स्क्रिप्टिंग सुरू झालं आहे. ही माहिती खुद्द टीमने दिलीय. विशेष म्हणजे, हा सिक्वेल पूर्वीच्या दोन्ही भागांपेक्षा अधिक भव्य, रोमांचक आणि रहस्यमय असणार आहे.
दरम्यान, 'हसीन दिलरुबा ३' कधी प्रदर्शित होणार, याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. 'हसीन दिलरुबा' हा २०२१ मध्ये थेट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. या सिनेमाच्या क्राईम-लव्ह स्टोरीने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. त्यानंतर गेल्यावर्षी २०२४ मध्ये 'फिर आयी हसीन दिलरुबा' प्रदर्शित झाला. यामध्ये सनी कौशलची एन्ट्री आणि सिनेमातील ट्विस्टने प्रेक्षकांना प्रेमात पाडलं होतं. आता 'हसीन दिलरुबा ३'मधील सस्पेन्स, थ्रिल आणि लव्ह स्टोरी यांचं अनोखं मिश्रण पुन्हा एकदा प्रेक्षकांना बांधून ठेवणार का? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.