हर्षवर्धन राणेने पुन्हा एकदा पाकिस्तानी अभिनेत्रीला सुनावले खडे बोल, म्हणाला- "किती द्वेष..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 10:51 IST2025-05-12T10:50:42+5:302025-05-12T10:51:15+5:30
सनम तेरी कसम सिनेमातील कलाकारांचा वाद आणखी शिगेला पोहोचला आहे. मावराच्या वक्तव्यावर हर्षवर्धनने तिला खडे बोल सुनावले आहेत.

हर्षवर्धन राणेने पुन्हा एकदा पाकिस्तानी अभिनेत्रीला सुनावले खडे बोल, म्हणाला- "किती द्वेष..."
भारत-पाकिस्तान देशात सध्या तणावाचं वातावरण सुरु आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवलं. त्यानंतर देशाच्या सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण झालं. या सगळ्या वातावरणात पाकिस्तानी सेलिब्रिटींनी भारताला दोष देऊन या हल्ल्याचा निषेध केला. त्यामुळे कोणे एके काळी बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांचा बदललेला सूर पाहून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. अशातच काल 'सनम तेरी कसम' फेम अभिनेता हर्षवर्धन राणे (harshvardhan rane) आणि अभिनेत्री मावरा होकेन (mawra hocane) यांच्यातल्या वाद आणखी टोकाला गेल्याचं दिसतंय. हर्षवर्धन पुन्हा एकदा मावरावर भडकलेला दिसतोय.
हर्षवर्धनने मावराला सुनावले खडे बोल
झालं असं की, 'सनम तेरी कसम २'मध्ये आधीची कास्टिंग असेल तर मी सिनेमात काम करणार नाही, असं हर्षवर्धनने जाहीर केलं होतं. त्यावर मावराने हर्षवर्धनच्या म्हणण्याला PR स्ट्रॅटेजी म्हटलं. त्यामुळे हर्षवर्धन पाकिस्तानी अभिनेत्री मावरावर पुन्हा रागावलेला दिसला. हर्षवर्धन म्हणाला की, "तिच्या विधानात फक्त द्वेष आणि वैयक्तिक टीका आहेत. मी कधीही तिच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवला नाही." अशा शब्दात हर्षवर्धनने मावराला चांगलंच सुनावलं आहे.
मावरा काय म्हणाली होती
'सनम तेरी कसम २'मध्ये पूर्वीचे कलाकार असतील तर मी काम करणार नाही म्हटल्यावर, असं हर्षवर्धन राणे म्हणाला होता. त्यावर अभिनेत्री मावराने सोशल मीडियावर लिहिलं होतं की, "आपल्या देशात युद्धासारखी परिस्थिती आहे आणि तुम्ही सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी एक PR स्टेटमेंट घेऊन आला आहात? किती दुःखद गोष्ट आहे. चित्रपटांवर चर्चा करण्याची, एकमेकांची चेष्टा करण्याची, एकमेकांना कमी लेखण्याची ही वेळ नाही. जर तुम्ही ९ वर्षांनंतर आदर न बाळगता माझे नाव वापरून बातम्यांमध्ये येत असाल, तर कदाचित तुम्ही चुकीच्या टीमने वेढलेले आहात. तुम्ही युद्धाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करू नये, त्यामुळे अनेक लोकांचे प्राण गेले. माझा देश सर्वांपेक्षा वर आहे."