​वाराणसीत पोहोचले हॅरी अन् सेजल ! धम्माल मस्ती, नाच-गाणे अन् बनारसी पान!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 10:54 IST2017-08-01T05:24:19+5:302017-08-01T10:54:19+5:30

हॅरी आणि त्याची सेजल यांनी काल सोमवारी वाराणसीत अगदी धम्माल केली. आम्ही शाहरूख खान आणि अनुष्का शर्माबद्दल बोलतोयं, हे तुम्हाला कळले असेलच. होय! काल शाहरूख व अनुष्का त्यांचा आगामी चित्रपट ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रमोशनसाठी वाराणसीत पोहोचले.

Harry and Sejal reached Varanasi! Dhammal fun, dance and banarasi pan !! | ​वाराणसीत पोहोचले हॅरी अन् सेजल ! धम्माल मस्ती, नाच-गाणे अन् बनारसी पान!!

​वाराणसीत पोहोचले हॅरी अन् सेजल ! धम्माल मस्ती, नाच-गाणे अन् बनारसी पान!!

री आणि त्याची सेजल यांनी काल सोमवारी वाराणसीत अगदी धम्माल केली. आम्ही शाहरूख खान आणि अनुष्का शर्माबद्दल बोलतोयं, हे तुम्हाला कळले असेलच. होय! काल शाहरूख व अनुष्का त्यांचा आगामी चित्रपट ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रमोशनसाठी   वाराणसीत पोहोचले. चित्रपटाचा दिग्दर्शक अर्थात इम्तियाज अली हाही या दोघांसोबत होता. वाराणसीच्या अशोका इन्स्टिट्यूटमध्ये शाहरूख, अनुष्का व इम्तियाज पाहोचले आणि गर्दी जणू भान हरपली. अभिनेता मनोज तिवारी या सर्वांचे आतिथ्य करताना दिसला. यानंतर झाली ती धम्माल मस्ती, नाच-गाणे आणि बनारसी पान. 



{{{{twitter_video_id####}}}}




होय, मनोज तिवारीने ‘जब हॅरी मेट सेजल’चे नाव भोजपुरीत भाषांतरित केले. ‘जब हॅरिया मिलल सेजलवा’, असे त्याने म्हणताच हजारोंच्या गर्दीत एकच खसखस पिकली. शाहरूख व अनुष्काही यावर खळखळून हसले. यानंतर मनोज तिवारीने ‘लगावे लू तू जब लिपिस्टिक, कमरिया करे लपालप लॉली पॉप लागे लू’ गायले आणि किंगखान स्वत:ला रोखू शकला नाही. मनोजच्या या गाण्यावर शाहरूखने असा काही ताल धरला की, सगळी गर्दी बेभान झाली. शाहरूखनेही मनोजच्या तालात ताल मिसळला. शिवाय अनुष्कालाही यात सामील करून घेतले. अनुष्का व शाहरूखला पाहण्यासाठी याठिकाणी हजारोंची गर्दी उसळली होती. शाहरूखच्या सुरक्षेसाठी तब्बल दीडशे बाऊन्सर तैनात होते.


खाई के पान बनारस वाला...









वाराणसीत जायचे अन् येथील बनारसी पान खायचे नाही, असे होवूच शकत नाही. येथे पोहोचल्या पोहोचल्या शाहरूखने बनारसी पानाची फर्माईश केली. मग काय, शाहरूखने अनुष्का, इम्तियाज सर्वांना   बनारसी पान दिले. यानंतर अनुष्काने स्वत:च्या हातांनी शाहरूखला बनारसी पान खिलवले. बनारसी पानाने तोंड गोड केल्यानंतर कुठे शाहरूख प्रमोशनसाठी इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचला.

Web Title: Harry and Sejal reached Varanasi! Dhammal fun, dance and banarasi pan !!