साशा रामचंदानीसोबत लवकरच विवाह बंधनात अडकणार हरमन बावेजा, समोर आली लग्नाची तारीख
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 11:17 IST2021-01-18T11:11:11+5:302021-01-18T11:17:04+5:30
‘लव्ह स्टोरी २०५०’ सिनेमातून हरमनने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती.

साशा रामचंदानीसोबत लवकरच विवाह बंधनात अडकणार हरमन बावेजा, समोर आली लग्नाची तारीख
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत 24 जानेवारीला लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. त्यानंतर यावर्षी बॉलिवूडचे आणखी एक अभिनेता मॅरेड क्लबमध्ये सामील होणार आहे.
बॉलिवूड अभिनेता हरमन बावेजाने डिसेंबर 2020मध्ये हेल्थ कोच साशा रामचंदानीसोबत साखरपुडा पार केला. हरमनची बहीण रोवेनाने सोशल मीडियावर दोघांच्या पहिला फोटो शेअर करत कुटुंबामध्ये साशाचे स्वागत केलं होतंं.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार हरमन बावेजा आणि साशा यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. 21 मार्च 2021 रोजी हरमन बावेजा आणि साशाचे कोलकातामध्ये लग्न होणार आहे. लग्नाच्या सोहळ्याबद्दल त्याने कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रांनाही माहिती दिली आहे.
हरमन आणि साशा या दोघांच्याही कुटुंबात लग्नाची तयारी सुरू झाली आहे. चित्रपटसृष्टीतील मोजकेच लोक या लग्नाला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. हरमनने 50-70 लोकांची यादी तयार केली आहे, ज्यांना लग्नासाठी आमंत्रित केले जाईल. मुंबईत रिसेप्शन होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
२००९ मध्ये आलेल्या ‘लव्ह स्टोरी २०५०’ डेब्यू करणारा हरमन बावेजा त्याच्या अॅक्टिंगपेक्षा हृतिक रोशनचा डुप्लिकेट म्हणूनच अधिक लोकप्रिय झाला होता.त्याचा हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण लुक्स आणि हॉट बॉडी यामुळे हरमनची त्यावेळी बरीच क्रेझ होती. अर्थात हळूहळू ही क्रेझ ओसरली आणि हरमन बॉलिवूडमधून गायब झाला.