​ ‘हे’ स्टार किड्स साजरी करताहेत पहिली होळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2017 13:53 IST2017-03-13T07:28:56+5:302017-03-13T13:53:36+5:30

बॉलिवूडची होळी यंदा खास असणार आहे आणि असणार का नाही? अनेक बॉलिवूड स्टार किड्स यंदा पहिल्यांदा होळी साजरी करताहेत. ...

'Happy' Star Kids are celebrating Holi! | ​ ‘हे’ स्टार किड्स साजरी करताहेत पहिली होळी!

​ ‘हे’ स्टार किड्स साजरी करताहेत पहिली होळी!

लिवूडची होळी यंदा खास असणार आहे आणि असणार का नाही? अनेक बॉलिवूड स्टार किड्स यंदा पहिल्यांदा होळी साजरी करताहेत. म्हणजेच ही त्यांची पहिली होळी आहे. त्यांच्या मम्मी-पापांसाठीही ही होळी खास असणार आहे. यात अलीकडे बाप झालेला दिग्दर्शक व निर्माता करण जोहर, गोंडस तैमूरची ग्लॅमरस मम्मा करिना कपूर, मीशाचा लाडका बाबा शाहिद कपूर आदींचा समावेश आहे.

करण जोहरची जुळी मुलं

करण जोहर अलीकडे सरोगसीच्या मदतीने दोन जुळ्या मुलांचा बाप झाला. त्याने त्याच्या मुलांचे नाव रूही आणि यश असे ठेवले आहे. रूही आणि यश या दोघांची यंदाची होळी पहिली होळी आहे. दोन दिवसांपूर्वी करणने यश व रूहीची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली होती.

सैफ- करिनाचा तैमूर



सैफ अली खान आणि बेगम करिना कपूर खान यांचा लाडका तैमूर याचीही ही पहिली होळी आहे. २० डिसेंबर २०१६ रोजी तैमूरचा जन्म झाला.

शाहिद कपूर-मीरा राजपूतची मीशा


बॉलिवूडचा राजकुमार म्हणजेच शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची राजकन्या मीशा हिचीही यंदाची पहिली होळी आहे. २६ आॅगस्ट २०१६ रोजी मीशाचा जन्म झाला.

हरभजन आणि गीताची तान्हुली



क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा या दोघांची चिमुकली यंदा पहिली होळी साजरी करते आहे. गतवर्षी २७ जुलैला तिचा जन्म झाला होता.

जेनेलिया आणि रितेश देशमुख यांचा दुसरा मुलगा



अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया गतवर्षी दुसºयांदा मम्मी-पप्पा झालेत. १ जूनला जन्मलेल्या या मुलाचे नाव रितेश व जेनेलियाने राहिल असे ठेवले आहे. राहिलची ही पहिली होळी आहे.

तुषार कपूर



तुषार कपूर यंदा सरोगसीच्या माध्यमातून सिंगल पॅरेन्ट झाला. तुषारने आपल्या मुलाचे नाव लक्ष्य असे ठेवले आहे. लक्ष्यची पण ही पहिली होळी आहे.

Web Title: 'Happy' Star Kids are celebrating Holi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.