इमरान खान इज बॅक! 'हॅपी पटेल'चा ट्रेलर पाहून बसेल आश्चर्याचा धक्का; आमिरचा लूक व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 17:48 IST2025-12-19T17:46:13+5:302025-12-19T17:48:40+5:30
आमिर खानचा 'सुपर क्यूट' पुतण्या १० वर्षांनी पडद्यावर परततोय!

इमरान खान इज बॅक! 'हॅपी पटेल'चा ट्रेलर पाहून बसेल आश्चर्याचा धक्का; आमिरचा लूक व्हायरल
Happy Patel: Khatarnak Jasoos Trailer : 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा आमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आमिर खान प्रोडक्शन्स नेहमीच हटके आणि अनोख्या कथा सादर करत आलं आहे. आता, आमिर खानचा एक नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आज स्पाय कॉमेडी चित्रपट 'हॅपी पटेल: डेंजरस जासूस'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
'हॅपी पटेल: खतरनाक जासूस' या ट्रेलरमध्ये जबरदस्त विनोद आणि अनेक मजेशीर, हटके ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता आणि स्टँड-अप कॉमेडियन वीर दासनेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे आणि तो मुख्य भूमिकेतही आहे. २ मिनिटे ३८ सेकंदांच्या ट्रेलरमध्ये वीर दास एका अशा गुप्तहेराच्या भूमिकेत आहे.
अभिनेत्री मोना सिंग अनोख्या लूकमध्ये दिसून आली आहे. ट्रेलरमधील सर्वात मोठे सरप्राईज म्हणजे अभिनेता इमरान खान. तो एका वेगळ्याच अवतारात दिसतो आहे. यासोबतच आमिर खान देखील एका छोट्या पण महत्त्वाच्या आणि वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळाला आहे. तर ट्रेलरमध्ये मराठमोळ्या मिथिला पालकरची झलक पाहायला मिळाली. एवढेच नाही तर या चित्रपटात रॅपर सृष्टी तावडेदेखील एका खास भुमिकेत आहे.
'दिल्ली बेली' या गाजलेल्या चित्रपटानंतर वीर दास आणि आमिर खान पुन्हा एकदा 'हॅपी पटेल'च्या निमित्ताने एकत्र आले आहेत. हा स्पाय कॉमेडी चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.