Happy moments : संजय दत्तने स्कूटरवर घडविली मान्यता अन् मुलांना आग्रा सफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 16:57 IST2017-02-18T11:27:55+5:302017-02-18T16:57:55+5:30
शिक्षा भोगून पुन्हा आपल्या बॉलिवूड करिअरवर लक्ष केंद्रित करणारा अभिनेता संजय दत्त सध्या त्याच्या आगामी ‘भूमी’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी ...
Happy moments : संजय दत्तने स्कूटरवर घडविली मान्यता अन् मुलांना आग्रा सफर
श क्षा भोगून पुन्हा आपल्या बॉलिवूड करिअरवर लक्ष केंद्रित करणारा अभिनेता संजय दत्त सध्या त्याच्या आगामी ‘भूमी’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी आग्रा येथे तळ ठोकून आहे. अशात त्याची पत्नी मान्यतानेही मुलांसह आग्रा येथे हजेरी लावल्याने हा संपूर्ण परिवार सध्या आग्रा या पर्यटनस्थळी एकप्रकारची ट्रिपच एन्जॉय करीत आहे. संजूबाबाने याच संधीचे सोने करण्यासाठी संपूर्ण परिवाराला चक्क स्कूटरवरून आग्राची सैर घडवून आणली आहे.
संजय दत्त कारागृहात असल्याने त्याचा परिवार एकप्रकारे विभागला होता. आता तो शिक्षा भोगून बाहेर आल्याने अधिकाधिक वेळ परिवारासोबत राहू इच्छितो. अशात पत्नी मान्यताही त्याच्यापासून दूर राहणे पसंत करीत नाही. त्यामुळे तो ज्याठिकाणी शूटिंगला जातो तिथे हमखासपणे मान्यता मुलांसोबत हजेरी लावते. त्यामुळेच ती संजूबाबाच्या पाठोपाठ मुलांसोबत आग्रा येथे पोहचली. मुंबई ते दिल्ली असा प्लेनने प्रवास करणाºया मान्यताने मात्र आग्रा या शहराची सैर चक्क स्कूटरवर केली.
![]()
या खास आठवणींचे काही फोटो मान्यताने गेल्या शनिवारी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये संजूबाबा स्कूटरवर संपूर्ण परिवाराला घेऊन आग्रा शहरात फेरफटका मारताना बघावयास मिळत आहे. खरं तर हा फोटो ‘भूमी’च्या सेटवरचाच असल्याचे दिसत आहे. मान्यता आणि संजय दत्तचा विवाह २००८ साली झाला होता. मान्यता संजय दत्तची तिसरी पत्नी आहे.
दरम्यान, संजूबाबाच्या या सिनेमाचे शूटिंग बºयापैकी पूर्ण झाले असून, येत्या ४ आॅगस्ट रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. सध्या संजूबाबा या सिनेमाबरोबर त्याच्या बायोपिकमुळेही चर्चेत आहे. संजूबाबाच्या या बायोपिकमध्ये त्याची भूमिका रणबीर कपूर साकारणार आहे. राजकुमार हिराणी या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत.