Happy Birthday : अभिनेत्री नाही तर वहिदा रहमान यांना बनायचे होते डॉक्टर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 15:13 IST2017-02-03T09:24:06+5:302017-02-03T15:13:55+5:30

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांचा आज (३ फेब्रुवारी) वाढदिवस. सुमारे पाच दशके बॉलिवूडवर राज्य करणाºया वहिदा रहमान म्हणजे ...

Happy Birthday: Wahida Rehman was not supposed to be an actress, but a doctor! | Happy Birthday : अभिनेत्री नाही तर वहिदा रहमान यांना बनायचे होते डॉक्टर!

Happy Birthday : अभिनेत्री नाही तर वहिदा रहमान यांना बनायचे होते डॉक्टर!

लिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांचा आज (३ फेब्रुवारी) वाढदिवस. सुमारे पाच दशके बॉलिवूडवर राज्य करणाºया वहिदा रहमान म्हणजे सौंदर्याची खाण. वहिदा यांच्याबद्दल अनेक गोष्टी आहेत, ज्या कदाचित तुम्हाला ठाऊक नसतील.



खरे तर वहिदा यांना डॉक्टर बनायचे होते. मात्र नशीबाने त्यांना अभिनेत्री बनवले.



उण्यापुºया १३ वर्षांच्या असताना वहिदांना चित्रपटाच्या आॅफर्स मिळायला लागल्या होत्या. अनेक निर्माता -दिग्दर्शकांनी त्यांना चित्रपटात काम करण्याच्या आॅफर्स दिल्यात. पण वहिदा यांच्या वडिलांनी त्या धुडकावून लावल्यात. पण वडिलांचे निधन झाल्यावर संपूर्ण घराची जबाबदारी वहिदा यांच्या खांद्यावर आली आणि आर्थिक गरज भागवण्यासाठी वहिदा चित्रपटसृष्टीत आल्या.



गुरूदत्त यांनी वहिला यांना पहिल्यांदा पाहिले आणि त्यांच्या अ‍ॅक्टिंगने प्रभावित होऊन त्यांना आपल्या ‘सीआयडी’ या चित्रपटात निगेटीव्ह रोल आॅफर केला. हा चित्रपट हिट झाला. यातील वहिदांच्या अभिनयाचे वारेमाप कौतुक झाले.



वहिदा यांनी गुरुदत्त यांचा पहिला चित्रपट साईन केला तेव्हा त्यांनी त्यात स्वत:ची एक अट घातली होती. ती म्हणजे चित्रपटात कपडे स्वत:च्या मर्जीने घालण्याची.



‘प्यासा’मध्ये गुरुदत्त व वहिदा यांची जोडी मोठ्या पडद्यावर झळकली. येथूनच या दोघांच्या पे्रमकथेला सुरुवात झाली. त्यावेळी गुरुदत्त विवाहित होते. त्यांची पत्नी गीता यांना ही गोष्ट कळल्यावर त्या घर सोडून निघून गेल्या. ‘कागज के फूल’ हा चित्रपट वहिदा व गुरुदत्त यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे, असे मानले जाते.



राजकपूर यांच्यासोबत ‘तिसरी कसम’ या चित्रपटात वहिदा यांनी हिराबाईचे पात्र साकारले. या चित्रपटातील ‘पान खाए सैंया हमार...’प्रचंड लोकप्रीय झाले होते.



गुरुदत्त यांच्यासोबतची वहिदा रहमान यांची प्रेमकथा अधूरी राहिली. यानंतर वहिदा यांनी अभिनेता कंवलजीत यांच्यासोबत विवाह केला. २००२ मध्ये वहिदा यांच्या पतीचे आकस्मिक निधन झाले.

Web Title: Happy Birthday: Wahida Rehman was not supposed to be an actress, but a doctor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.