happy Birth day Namrata : जाणून घ्या, नम्रता शिरोडकर आणि महेशबाबूची लव्ह स्टोरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 13:22 IST2017-01-22T07:52:57+5:302017-01-22T13:22:57+5:30
‘मिस इंडिया’ नम्रता शिरोडकर आज बॉलिवूडपासून दूर आहे. पण नम्रताने बॉलिवूडचा एककाळ चांगलाच गाजवला होता.१९९३ मध्ये नम्रताने फेमिना मिस ...

happy Birth day Namrata : जाणून घ्या, नम्रता शिरोडकर आणि महेशबाबूची लव्ह स्टोरी!
यानंतर ‘पुकार’,‘वास्तव’,‘हेराफेरी’,‘अस्तित्व’,‘कच्चे धागे’,‘तेरा मेरा साथ रहे’ आणि ‘एलओसी: कारगिल’ अशा अनेक हिट सिनेमांत नम्रता दिसली. बॉलिवूडमध्ये यश मिळवल्यानंतर नम्रता दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळली आणि याच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नम्रताला तिचा जोडीदार मिळाला. होय, साऊथचा सुपरस्टार महेशबाबू. नम्रता व महेशबाबूची लव्हस्टोरी कदाचित तुम्हाला माहित नसेन. आज (२२) नम्रताचा वाढदिवशी तिची व महेशबाबूची लव्हस्टोरी आम्ही तुमच्यासमोर उलगडणार आहोत...वाचा तर...
या सेटवर झाली मैत्री
सन २००० मध्ये नम्रता ‘वामसी’ या तेलगू चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त होती. याच चित्रीकरणादरम्यान तिची महेशबाबूशी ओळखझाली होती. ही ओळख नंतर मैत्रीत बदलली आणि पुढे प्रेमात.
चार वर्षे डेटिंग
नम्रता व महेशबाबू लग्नापूर्वी उणेपुरे चार वर्षे एकमेकांना डेट करत होते. यानंतर फेबु्रवारी २००५ मध्ये नम्रता व महेशबाबूने लग्नाचा निर्णय घेतला. आता नम्रता व महेशबाबूच्या संसारवेलीवर दोन फुले फुलली आहेत. या दोघांची दोन मुले आहेत. मुलगा गौतम आणि मुलगी सितारा.
साडे तीन वर्षांनी लहान
महेशबाबू नम्रतापेक्षा वयांनी साडे तीन वर्षांनी लहान आहे. महेशबाबूला त्याची पत्नी गृहिणी असावी, असे वाटत होते. महेशबाबूच्या प्रेमाखातर नम्रताने आपले फिल्मी करिअर सोडत पूर्णपणे गृहिणी होण्याचा निर्णय घेतला.
Related story : म्हणून परिणीतीने महेशबाबूसोबत काम करण्यास दिला नकार!!