Karan Johar : आलिशान बंगला, लग्झरी कार, राजेशाही थाटात जगतो करण जोहर, इतक्या कोटी संपत्तीचा आहे मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 11:20 AM2023-05-25T11:20:39+5:302023-05-25T11:24:31+5:30

बॉलिवूडच्या श्रीमंतीची चर्चा सतत होते. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींची कोट्यवधींची संपत्ती आहे. यात करण जोहरही मागे नाहीत....

Happy birthday karan johar luxury houses expensive cars and immense wealth know how much is filmmaker networth | Karan Johar : आलिशान बंगला, लग्झरी कार, राजेशाही थाटात जगतो करण जोहर, इतक्या कोटी संपत्तीचा आहे मालक

Karan Johar : आलिशान बंगला, लग्झरी कार, राजेशाही थाटात जगतो करण जोहर, इतक्या कोटी संपत्तीचा आहे मालक

googlenewsNext

करण जोहर हा बॉलिवूडमधील सर्वोत्तम चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. बॉलिवूडचे सर्वात महागडे चित्रपट बनवण्यासाठी आणि अनेक सुपरस्टार्सना एकत्र आणण्यासाठीही तो ओळखला जातो. करणचे वडील यश जोहर हे देखील उत्तम चित्रपट निर्माते होते. करण जोहर आज आपला ५१ वा वाढदिवस साजरा करतो आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याची लग्झरी लाईफस्टाईलबाबत.  


करण जोहरचे नेटवर्थ 
करण जोहरच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, द फायनान्शियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, तो 1740 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. त्याची  कमाई धर्मा प्रोडक्शन या चित्रपट निर्मिती कंपनीतून होते. याशिवाय तो इतर प्रोडक्शन हाऊसमध्येही पैसे गुंतवतो. 

करण जोहरकडे आलिशान मालमत्ता आहे. मुंबईतील कार्टर रोडवर असलेल्या त्यांच्या बंगल्याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. करणने हा बंगला 2010 मध्ये 32 कोटींना विकत घेतला होता. या बंगल्यातून समुद्र दिसतो. त्याचवेळी मलबार हिल्समध्ये त्यांचे एक आलिशान घर आहे. रिपोर्ट्सनुसार या घराची किंमत 20 कोटी रुपये आहे.

करण जोहरलाही लक्झरी कारचीदेखील आवड आहे. त्याच्याकडे BMW 745, BMW 760, Mercedes S क्लास आणि अनेक आलिशान कार आहेत. त्यांची किंमत करोडोंमध्ये आहे.

करण जोहरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून कमबॅक करतोय. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 28 जुलैला रिलीज होणार आहे.

Web Title: Happy birthday karan johar luxury houses expensive cars and immense wealth know how much is filmmaker networth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.