Birthday Special: 38 वर्षांचा झाला इमरान खान, सिनेमांपेक्षा पर्सनल लाईफमध्ये करतोय स्ट्रगल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 17:33 IST2021-01-13T17:29:00+5:302021-01-13T17:33:39+5:30
आज बॉलिवूड अभिनेत आमिर खानचा भाचा इमरान खानचा आज वाढदिवस आहे.

Birthday Special: 38 वर्षांचा झाला इमरान खान, सिनेमांपेक्षा पर्सनल लाईफमध्ये करतोय स्ट्रगल
आज बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा पुतण्या इमरान खानचा आज वाढदिवस आहे. इमरान आज ३८ वर्षांचा झाला. त्याचा जन्म अमेरिकेच्या विस्कॉन्सिन येथे झाला. अमेरिकेत जन्मल्यामुळे तो अमेरिकन नागरिक आहे. २००८ साली 'जाने तू ... या जाने ना' या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता.
यानंतर इमरान खानने 'आय हेट लव्ह स्टोरी', 'आफ्टर ब्रेक', 'देल्ली-बेली, 'मेरे ब्रदर की दुल्हन' आणि 'वन्स अपॉन टाइम मुंबई अगेन' अशा अनेक चित्रपटात काम केले. २०१५ मध्ये आलेल्या 'कट्टी बट्टी' या सिनेमात तो कंगना रनौत सोबत तो शेवटचा दिसला होता. आज इमरान बॉलिवूडच्या झगमगटापासून दूर आहे.
पत्नीबरोबर वादविवाद
इमरान खान बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण जेवढे स्ट्रगल करावे लागले तेवढेच स्ट्रगल त्याला त्याच्या पर्सनल लाईफमध्ये देखील करावं लागलं. इमरान खान आणि त्याच्या पत्नी अवंतिका गेल्या काही दिवसांपासून वेगळं राहतात. दोघांमधले मतभेद इतके टोकाला गेले आहेत की दोघे घटस्फोट घेण्याच्या विचारात आहेत.
अमेरिकन नागरिकत्व वरून वाद
इमरान खानने अमेरिकतील सरकारकडे भारताचे नागरिकत्व मिळावे म्हणून अपील केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो केस लढत आहे, परंतु अमरेकिन सरकार त्यांची मागणी स्वीकारत नाही. अमरेकिचे सरकार इम्रान खानचे नागरिकत्व रद्द करण्यासाठी कोट्यावधी रुपयाची मागणी करीत आहेत, तर इमरान खानने ही रक्कम देण्यास नकार दिला आहे.