Happy Birthday: अथिया शेट्टीने लहानपणी पाहिले होते ‘हे’ स्वप्न!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 11:50 IST2017-11-05T06:18:50+5:302017-11-05T11:50:29+5:30
सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी हिचा आज (५ नोव्हेंबर) वाढदिवस. ५ नोव्हेंबर १९९२ रोजी जन्मलेली अथिया सध्या बॉलिवूडमध्ये फार ...
.jpg)
Happy Birthday: अथिया शेट्टीने लहानपणी पाहिले होते ‘हे’ स्वप्न!!
स नील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी हिचा आज (५ नोव्हेंबर) वाढदिवस. ५ नोव्हेंबर १९९२ रोजी जन्मलेली अथिया सध्या बॉलिवूडमध्ये फार नवखी आहे. आत्तापर्यंत अथियाचे केवळ दोन सिनेमे रिलीज झाले आहेत.
![]()
२०१५ मध्ये अथियाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. ‘हिरो’ या चित्रपटाद्वारे तिने डेब्यू केला होता. हा चित्रपट सलमान खानने प्रोड्यूस केला होता. ‘हिरो’मधून केवळ अथियाचं नाही तर आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली यानेही डेब्यू केला होता.
![]()
अथियाला लहानपणापासून चित्रपटांची आवड होती. अभिनेत्री बनणे हेच तिचे स्वप्न होते. पापा सुनील शेट्टी, आई माना शेट्टी आणि भाऊ अहान शेट्टी यांनी अथियाचे हे स्वप्न पूर्ण करण्यात मदत केली.
![]()
अथिया सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असते. सध्या अथियाकडे कुठलाही चित्रपट नाही. पण मोठ-मोठ्या ब्रॅण्डच्या फोटोशूटमध्ये ती सध्या बिझी आहे. न्यूयॉर्कमध्ये अथियाने अभिनयाचे शिक्षण घेतलेय. केवळ अॅक्टिंगचं नाही तर एडिटींग, डायरेक्शनही ती शिकलीय. पण तिचा सगळा फोकस अॅक्टिंगमध्ये होता.
![]()
एका मुलाखतीत अथियाने म्हटले होते की, ती अॅक्टिंगबद्दल प्रचंड गंभीर आहे. अभिनयाबद्दल मी पॅशनेट आहे. चित्रपटांच्या दुनियेत मी शेवटपर्यंत आपले स्थान टिकवून ठेवेल, अशी आशा मी करते.
![]()
इन्टाग्रामवर अथियाचे १५ लाखांवर फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर अथिया तिचे नवनवीन फोटो पोस्ट करत असते.अथिया तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींना तिने याबाबतीत मागे टाकले आहे.
![]()
ALSO READ: २५ वर्षांची झाली सुनील शेट्टीची मुलगी, लहानपणी अशी दिसायची !
एक स्टार किड्स असल्याचे प्रेशर अथियावर असते. माझी स्पर्धा स्वत:शी आहे. पण काही लोक माझी तुलना पापासोबत करतात. ते आजही इतके हँडसम आणि फिट दिसतात. माझी त्यांच्यासोबत कुठलीही तुलना होऊ शकत नाही. पण तरिही त्यांची मुलगी या नात्याने एक अप्रत्यक्ष दडपण जाणवतेच, असे अथिया एका मुलाखतीत म्हणाली होती.