/>२० एप्रिल म्हणजे अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाचा वाढदिवस. आज अभिषेक व ऐश्वर्याच्या लग्नाला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. अमिताभ बच्चन यांनी लेकाला आणि सूनेला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहे. हा क्षण आनंदाचा आणि सुखाचा असल्याचे त्यांनी म्हटले. ‘उद्याचा दिवस उगवेल तेव्हा तुमच्या नात्याला नऊ वर्षे पूर्ण होतील. हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि सुखाचा क्षण असेल. कारण त्यादिवशी तुम्हीच नाही तर आम्ही मोठी मंडळीही एका नात्यात बांधलो गेलो होतो. तो क्षण म्हणजे संपूर्ण कुटुंबांनी एकत्र येण्याचा आणि प्रेमाचा होता,’ असे अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे.
२० एप्रिल २००७ रोजी अभिषेक व ऐश्वर्याचे मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते.यानंतर नोव्हेंबर २०११ मध्ये आराध्याचा जन्म झाला.
Web Title: Happy Birthday Amitabh Bachchan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.