Aaradhya Bachchanसोबतचा Lip Kissचा फोटो शेअर करताचा ऐश्वर्या झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 16:01 IST2022-11-16T15:58:02+5:302022-11-16T16:01:58+5:30
Happy Birthday Aaradhya Bachchan: ऐश्वर्या रायनं इंस्टाग्राम अकाऊंटवर आराध्या बच्चन आणि स्वतःचा एक खास फोटो शेअर केला आहे.

Aaradhya Bachchanसोबतचा Lip Kissचा फोटो शेअर करताचा ऐश्वर्या झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले...
Happy Birthday Aaradhya Bachchan: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चनची लाडली लेक आराध्या बच्चन हिचा आज वाढदिवस आहे. आराध्या आज 16 नोव्हेंबरला तिचा 11 वा वाढदिवस साजरा करत आहे. बर्थडेच्या निमित्ताने ऐश्वर्याने सोशल मीडियावर आपल्या मुलीवर प्रेम व्यक्त केले आहे. अभिनेत्रीने तिच्या मुलीसोबतचा स्वतःचा एक अतिशय सुंदर फोटो पोस्ट केला आणि तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ऐश्वर्या रायने इंस्टाग्राम अकाऊंटवर आराध्या बच्चन आणि स्वतःचा एक खास फोटो शेअर केला आहे. आई-मुलीच्या नात्यातील अतूट प्रेम आणि खास बंध या फोटोत स्पष्टपणे जाणवतं आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की ऐश्वर्या मुलगी आराध्याला ओठांवर किस (Lip Kiss)करताना दिसत आहे. आराध्याने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. तिथे त्याचे केस मोकळे आहेत. हा फोटो ऐश्वर्याने मध्यरात्री 12 च्या सुमारास इन्स्टा वर पोस्ट केला होता. फोटोच्या बॅकग्राऊंड 11 लिहिले आहे आणि आज आराध्याचा 11 वा वाढदिवस साजरा करत आहे.
फोटोवरुन झाली ट्रोल
हा फोटो पोस्ट करण्यासोबतच ऐश्वर्या रायने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझं प्रेम, माझं आयुष्य... मी तुझ्यावर खूप प्रेम करते... माझी आराध्या.' हजारो चाहते या फोटोला लाइक्स करत आहेत आणि आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तरी काही नेटकऱ्यांनी ऐश्वर्याला ट्रोल केलं आहे. मुलांना अशा प्रकारे लिप किस करणे हा आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि सभ्यतेचा भाग नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'तुम्ही असेच प्रेम करत आहात, हे ठीक आहे, पण असे फोचो सोशल मीडियावर शेअर करू नये'.