मुंबईतील अग्नितांडवावर हेमामालिनी यांनी केले भलतेच वक्तव्य; नव्या वादाला फुटणार तोंड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 21:18 IST2017-12-29T15:48:08+5:302017-12-29T21:18:08+5:30

सध्या जगभरात नव वर्षाची धूम बघावयास मिळत असून, सर्वत्र पार्टी अन् सेलिब्रेशनचे वातावरण आहे. मुंबईमध्ये तर याचा उत्साह काही ...

Hammamalini made a statement on fire in Mumbai; Will the new controversy come to an end? | मुंबईतील अग्नितांडवावर हेमामालिनी यांनी केले भलतेच वक्तव्य; नव्या वादाला फुटणार तोंड?

मुंबईतील अग्नितांडवावर हेमामालिनी यांनी केले भलतेच वक्तव्य; नव्या वादाला फुटणार तोंड?

्या जगभरात नव वर्षाची धूम बघावयास मिळत असून, सर्वत्र पार्टी अन् सेलिब्रेशनचे वातावरण आहे. मुंबईमध्ये तर याचा उत्साह काही औरच असतो. कारण मुंबईतील हॉटेल्स आणि पबमध्ये एकच तयारी केली जात असते. परंतु मुंबईतील एका पबमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे संपूर्ण मुंबापुरीत सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कमला मिल कम्पाउंड स्थित अबव रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत १५ नागरिकांचा मृत्यू झाला. तर १६ पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. आगीचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकले नसले तरी, शेजारील लंडन टॅक्सी बार आणि मोजो पब झळून पूर्णत: खाक झाले आहेत. या आगीमुळे राज्यभर हळहळ व्यक्त केली जात असून, बॉलिवूडमध्येही अनेक कलाकारांकडून दु:ख व्यक्त केले जात आहे. 

बºयाचशा सेलिब्रिटींनी याविषयी शोक व्यक्त करताना आपल्या भावना मांडल्या. परंतु अभिनेत्री तथा खासदार हेमामालिनी यांनी या संपूर्ण प्रकरणी एक वेगळाच सूर आवळल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. हेमामालिनी यांनी आगीचे कारण मुंबईची वाढती लोकसंख्या असल्याचे म्हटले आहे. हेमामालिनी यांनी म्हटले की, ‘पोलीस आपले काम चांगल्या पद्धतीने करीत नाहीत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. मात्र मुंबईमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळेच अशाप्रकारच्या घटनांना चालना मिळत आहे. मुंबईमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे जागा अपुरी पडत आहे. शहरात लोकसंख्या पुरेशी असताना बाहेरून येणाºयांना शहरात बंदी आणायला हवी. त्यांनी दुसºया शहरात स्थायिक व्हायला हवे.’



हेमामालिनी यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला वळण मिळाले असून, ते कुठले स्वरूप घेणार हे सांगणे मुश्किलच म्हणावे लागेल. पण काहीही असो, गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये अशाप्रकारच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले  आहे. दरम्यान, या अग्नितांडवानंतर मुंबई पोलिसांनी अबव रेस्टॉरंटविरोधात ३०४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Hammamalini made a statement on fire in Mumbai; Will the new controversy come to an end?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.