‘हाफ गर्लफ्रेंड’च्या रॅपअप पार्टीत श्रद्धा झाली इमोशनल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 19:23 IST2016-12-27T19:23:05+5:302016-12-27T19:23:05+5:30

बॉलिवूडची ‘चुलबुली गर्ल’ श्रद्धा कपूर आणि ‘हँडसम मुंडा’ अर्जुन कपूर यांनी नुकतेच मोहित सुरी दिग्दर्शित ‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटाचे शूटिंग ...

Half Girlfriend's Rapapoo Party Shrine Shawn Emotional! | ‘हाफ गर्लफ्रेंड’च्या रॅपअप पार्टीत श्रद्धा झाली इमोशनल!

‘हाफ गर्लफ्रेंड’च्या रॅपअप पार्टीत श्रद्धा झाली इमोशनल!

लिवूडची ‘चुलबुली गर्ल’ श्रद्धा कपूर आणि ‘हँडसम मुंडा’ अर्जुन कपूर यांनी नुकतेच मोहित सुरी दिग्दर्शित ‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. सेटवरील शूटिंगचे दिवस मिस करणार या भावनेने श्रद्धा कपूर रॅप अप पार्टीत चक्क भावविवश झाली. पार्टीवेळी तिचे अनुभव शेअर करण्यासाठी आयोजकांकडून विनंती करण्यात आली असता माईक हातात घेताच तिचे डोळे अश्रूंनी भरून आले.

‘आशिकी २’ चित्रपटाच्या माध्यमातून श्रद्धाने तिच्या बॉलिवूडमधील करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर तिने ‘एक विलेन’ हा चित्रपट याच टीमसोबत साकारला. सध्या तिचे करिअर यशस्वी वाटचाल करत आहे. एकता कपूरसोबत ‘हाफ गर्लफ्रेंड’ हा तिचा दुसरा चित्रपट आहे. एकता सोबत काम करणं म्हणजे  पुन्हा एकदा घरच्या वातावरणात रमण्यासारखं असल्याचं ती सांगते. तिच्या भावना तिने ट्विटरवर शेअर केल्या. ती म्हणते,‘एका अमेझिंग टीमसोबत मला काम करायला मिळतेय. सगळे टॅलेंटेड कलाकार या माध्यमातून एकत्र आले आहेत. चित्रपट बनवण्याच्या या सुंदर जगात मी पुन्हा वावरतेय, याचा मला आनंद होतोय.’ 

Web Title: Half Girlfriend's Rapapoo Party Shrine Shawn Emotional!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.