‘रामायण’मधील मंथराची खिल्ली उडविल्यामुळे संतापला ‘हा’ खलनायक!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 10:14 AM2018-02-03T10:14:24+5:302018-02-03T15:44:24+5:30

तब्बल ७०० चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करणाºया ललिता पवार यांची एका चित्रपटातून खिल्ली उडविल्यामुळे खलनायक रंजित चांगलेच संतापले आहेत.

'Hai' villain because of the ridicule of 'Ramayana'! | ‘रामायण’मधील मंथराची खिल्ली उडविल्यामुळे संतापला ‘हा’ खलनायक!

‘रामायण’मधील मंथराची खिल्ली उडविल्यामुळे संतापला ‘हा’ खलनायक!

googlenewsNext
सू भगनानी यांचा मुलगा जॅकी भगनानी निर्माता असलेला ‘दिल जंगली’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात तापसी पन्नू आणि साकिब सलीम मुख्य भूमिकांमध्ये बघावयास मिळणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ज्यामध्ये ‘रामायण’ या मालिकेत मंथराची भूमिका साकारणाºया वेटरन अभिनेत्री ललिता पवार यांची खिल्ली उडविण्यात आली. ट्रेलरमध्ये एक अभिनेता आपल्या सहअभिनेत्रीला म्हणतो की, ‘मनापासून तुला सांगावेसे वाटते की, तू अगदी त्या अभिनेत्रीसारखी दिसतेस.’  ती अभिनेत्री विचारते जेलो? (जेनिफर लोपेज) तो म्हणतो, ‘ननननन, ललिता पवार... कानी!’



मात्र हा प्रसंग प्रसिद्ध खलनायक रंजित यांना अजिबातच भावला नाही. त्यांच्या मते, या संवादातून ललिता पवार यांचा अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे याचा स्पष्ट शब्दात निषेध करतो. रंजित यांनी म्हटले की, असे म्हणणारे कोण आहेत? त्यांना खरोखरच धडा शिकवायला हवा. असे लोक हल्ली काहीही वायफळ बोलत आहेत. ललिताजींसारख्या सीनियर, ग्रेट अभिनेत्रीचा सन्मान करायला हवा. मी अशा प्रवृत्तीचा स्पष्ट शब्दात निषेध करतो. 



पुढे बोलताना रंजित यांनी म्हटेल की, खिल्ली उडविल्यामुळे किंवा एखाद्यावर टीका केल्याने चित्रपट चालत नसतो. इंडस्ट्रीतील एका नामांकित परिवाराकडून अशाप्रकारच्या चित्रपटाची निर्मिती केली जाणे खरोखरच लज्जास्पद आहे. यांचा स्टॅँडर्ड खूपच घसरलेला आहे. अशा लोकांसोबत काम करतानाही आम्हाला लाज वाटते. माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, मला जेव्हा जेव्हा चित्रपटात शिवी देण्यास सांगितले तेव्हा मी त्यास स्पष्टात नकार दिला. तसेच हे काम दुसºयांकडून करून घ्या, असेही ठणकावून सांगितले. वास्तविक आमच्या काळात निर्माते, दिग्दर्शक, लेखक असे करतच नव्हते. त्यामुळे सेन्सॉर बोर्डानेच या सर्व प्रकाराकडे लक्ष द्यायला हवे, असेही रंजित यांनी म्हटले. 

दरम्यान, कानी या शब्दप्रयोग अभद्र असून, एखाद्या कलाकाराच्या प्रतिष्ठेवर आघात करणारा आहे. अशाप्रकारचा संवाद त्या कलाकाराचा अपमान करणारा असून, सेन्सॉरबोर्ड या सर्व प्रकाराकडे कशा पद्धतीने बघते याकडे आता लक्ष लागून आहे. दरम्यान ललिता पवार यांनी १९३४ पासून टॉकी सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली. मूक चित्रपटांपासून त्यांनी जवळपास ७०० चित्रपटांमध्ये अभिनय केला. ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेतील मंथराची त्यांची भूमिका खूपच गाजली होती. 

Web Title: 'Hai' villain because of the ridicule of 'Ramayana'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.