'गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल'चे ३ पोस्टर रिलीज, पहा जान्हवीचा लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 16:54 IST2019-08-29T16:53:19+5:302019-08-29T16:54:00+5:30

अभिनेत्री जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट 'गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल'चा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

Gunjan Saxena - The Kargil Girl First Look: Janhvi Kapoor Gets Her Wings | 'गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल'चे ३ पोस्टर रिलीज, पहा जान्हवीचा लूक

'गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल'चे ३ पोस्टर रिलीज, पहा जान्हवीचा लूक

अभिनेत्री जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट 'गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल'चा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. करण जोहरने ट्विटरवर गुंजन सक्सेनावर बनत असलेल्या बायोपिकचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. हा फर्स्ट लूक जान्हवी कपूरने देखील इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 


जान्हवी तिन्ही पोस्टरमध्ये वेगळ्या अंदाजात पहायला मिळते आहे. तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टरमधील पहिल्या पोस्टरमध्ये ती कागदाचं विमान उडविताना दिसते आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये ती व पंकज त्रिपाठी पहायला मिळत आहेत आणि तिसऱ्या पोस्टरमध्ये जान्हवी एअरफोर्स पायलटच्या युनिफॉर्ममध्ये तिच्या सोबतच्या ऑफिसरांसोबत दिसत आहे.

करणने पोस्टर ट्विटरवर शेअर करत लिहिलं की, तिला सांगितलं गेलं होतं की मुली वैमानिक बनू शकत नाही. पण ती आपल्या ध्येयावर कायम राहिली आणि उडू पाहतेय.




दुसरा पोस्टर शेअर करून करण जोहर म्हणाला की, शूरता व धाडसासोबत तिने पुरूषांच्या जगात आपलं स्थान निर्माण केलं आहे.




तर तिसऱ्या पोस्टरमध्ये गुंजन सक्सेना (जान्हवी कपूर) तिच्या वडीलांना (पंकज त्रिपाठी) गळाभेट करताना दिसते आहे. हा पोस्टर शेअर करून करणने लिहिलं की, तिची ताकद तिचे वडील. त्यांनी गुंजनला उडण्यासाठी बळ दिलं.




शरण शर्माच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल' चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन व झी स्टुडिओजनं केली आहे. 


'गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल' हा चित्रपट इंडियन एअरफोर्सची पायलट गुंजन शर्माच्या जीवनावर आधारीत आहे. गुंजन शर्माने कारगिल युद्धाच्यावेळी एअरफोर्सचं विमान उडवलं होतं. या चित्रपटात जान्हवी व पंकज त्रिपाठी शिवाय अंगद बेदी, विनीत कुमार व मानव विज मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १३ मार्च, २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Gunjan Saxena - The Kargil Girl First Look: Janhvi Kapoor Gets Her Wings